परिशिष्टे - Page 592

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५५०

नाझीवाद हा एकाधिकारी भांडवलशाहीचा परिपाक होय असे मार्क्सवादी

होती व तिचा प्रभाव उदारमतवादी मानतात. जर्मनीत एकाधिकारी भांडवलशाही

परंतु या एकाधिकारी भांडवलशाहीचे कैसरच्या लोकशाहीला अनुकूल नव्हता;

होते. इंग्लंड अमेरिकेतही एकाधिकारी काळातही राष्ट्रसत्तेशी जवळचे नाते

भांडवलशाही होती; असे असूनही फक्त जर्मनीत एकाधिकारी भांडवलशाहीला नाझी हुकूमशाही का निर्माण करता आली; याचा खुलासा केवळ आर्थिक कारणांनी होत नाही. समाजात दृढमूल झालेल्या राजकीय परंपरा, संकल्पना व.संस्था यांचे बळ हा महत्त्वाचा घटक असतो. तो जर्मनीत, नसल्यामुळेच

नाझीवादाचा उदय होऊ शकला.

नाझीवादाचा उदय का झाला व त्याला जर्मन जनतेचा पाठिंबा का मिळू

शकला, याची कारणे नाझीवादाच्या प्रत्यक्ष अमानुष स्वरूपाइतकीच महत्त्वाची आहेत. त्यांतून मानवाला, विशेषतः मानवतेची, व्यक्तीस्वातंत्र्याची, समानतेची, लोकशाहीची आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये जपणाऱ्यांना एक महत्त्वाचा धडा

मिळतो. नाझीवादासारख्या मानवता व माणुसकीविरोधी शक्ती सुप्तपणे सर्वच समाजात असू शकतात. वंशवाद, आत्यंतिक राष्ट्रवाद, विशिष्ट समाजगटाचा ay, कल्पित वा वास्तव अन्यायाची गैरवाजवी चीड अशा अनेक प्रवृत्तींच्या

रसायनांतून हे तत्त्वज्ञान निर्माण होऊ शकते व त्याला व्यापक पाठिंबा मिळू

शकतो. म्हणून जगावर व मानवतेवर असे संकट पुन्हा न यावे यासाठी या

प्रवृत्तींविरुद्ध सतत सावधान राहणे आवश्यक असते.

मराठी विश्वकोश : ८, पृ. ४५०-४५१.