परिशिष्टे - Page 591

परिशिष्टे ५४९

आणि नेता यांची एकात्मता व एकनेतृत्वाचे तत्त्व प्रस्थापित करण्यात आले. सर्व जर्मन राष्ट्राचे त्याने नाझीकरण केले. वृत्तपत्रांचे नाझीकरण केले व ज्यांचे नाझीकरण करता येत नव्हते, ती वृत्तपत्रे बंद केली. बालवर्गापासून विद्यापीठापर्यंत सर्व शिक्षण नाझीवादाच्या प्रभुत्वाखाली आणले. तरुणांची एकमेव राष्ट्रीय हिटलर युवक संघटना स्थापन करण्यात आली. सर्व कामगार संघटना बेकायदेशीर करून त्याऐवजी कामगार व॑ मालक यांची संयुक्त कामगार आघाडी निर्माण करण्यात आली.

नाझीबादी हुकूमशाहीचे आणखी एक वैशिष्ट्य नमूद करण्यासारखे आहे. सामान्यतः हुकूमशाही वा सर्वाधिकारशाही म्हणजे अल्पसंख्यांकांची बहुसंख्यांवर त्यांच्या इच्छेविरूद्ध लादलेली सत्ता, असा अर्थ 'केला जातो; पण हिटलरच्या नाझी पक्षाला जर्मनीत १९३३ मध्ये झालेल्या शेवटच्या खुल्या निवडणुकीत ४४ टक्के मतदान झाले होते. नाझी पक्षासारखीच विचारसरणी असलेल्या अन्य पक्षांचे मतदान हिशेबात घेतले, तर नाझीवादाला पन्नास टक्क्यांच्यावर जर्मन मतदारांनी पाठिंबा दिला होता. बहुसंख्य मतदारांच्या संमतीने स्थापन झालेली आणि त्यावेळच्या वायमार प्रजासत्ताकाच्या संसदेने अधिकृतरीत्या मान्य केलेली आधुनिक काळातील ही एकमेव बहुमताची हुकूमशाही होती.

नाझीवादाने खून व दहशत हे आपले अधिकृत धोरण ठरविले होते; कारण चर्चा व वादविवाद यांवर त्यांचा विश्वास नव्हता. सॉक्रेटीसने बुद्धिवादाचा रोग प्रथम प्रसृत केला. कारण मूलभूत प्रश्‍न चर्चेने व वादविवादाने सोडवावे हा सिद्धांत त्यानेच प्रस्थापित केला. म्हणून सॉक्रेटीस हा पहिला सोशल डेमोक्रेट होता, असे नाझीवादाचा श्रेष्ठ सैद्धांतिक आर्थर रोझेनबर्ग म्हणत असे. एकंदरीत सर्व उदारमतविरोधी प्रवृत्तीचे व भूमिकांचे अंतिम व एकान्तिक पर्यवसान नाझीवादात झाले होते. आक्रमक नाझीवाद हा १९१९ च्या व्हर्साय तहात जर्मनीत झालेल्या अन्यायांमुळे उदयास आला अथवा १९२९-३२ सालांतील आर्थिक मंदीच्या परिणामामुळे पराभूत झालेल्या व बिकट अर्थसंकटात ग्रासलेल्या जर्मनीत निर्माण झाला, असे एक मत आहे. व्हर्सायच्या लहापेक्षा: द्वितीय महायुद्धानंतर जर्मनीची परिस्थिती अधिक भीषण झाली; परंतु तेथे पुन्हा नाझीवादाचा

उदय झाला नाही, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच १९२९-३२ ची

आर्थिक मंदीही जागतिक होती. इंग्लंड, अमेरिका हे देशही या मंदीच्या तडाख्यातून वाचले नव्हते; पण तेथे या आर्थिक संकटातून हुकूमशाही निर्माण झाली साही. जर्मनीत तसे घडले नाही, कारण त्यावेळी तेथे लोकशाही कमजोर होती आणि सर्वाधिकारी विचारसणीचा प्रभाव अगोदर वाढलेला होता.