परिशिष्ट-२१
बुवा गेले
रविवार ता. २८ मार्च १९४८ रोजी पहाटे मुंबई येथें, श्री. मडके बुवा स्वर्गवासी झाले, हें ' जनते ' च्या वाचकांना कळविण्यास आम्हास अत्यंत दुःख होत आहे.
त्यांना गेले कित्येक दिवस हृदयाचा विकार होता. त्या व्यथामधून मुक्त होण्यासाठीं त्यांनी हर प्रयत्न केले. पण व्यर्थ! शेवटी त्यांना अंथरुणास खिळून रहावे लागले नि त्यांतच त्यांचा अंत झाला. मृत्यूसमयी, त्यांचे ६९ वर्षांचे वय होते. त्यांच्या मृत्यूमुळे, डॉ. बाबासाहेबांच्या भार्षेत बोलावयाचे झाल्यास “ दलितांचा एक मोठा कार्यकर्ता, मजूरांचा एक मोठा ट्रेड युनियनिस्ट व दलित फेडरेशनचा प्रभावी संघटक, अस्पृश्यामधून नाहीसा झाला आहे. ” दलित वर्गाची, मजुरांची व फेडरेशनची ही एक मोठी हानीच झालेली आहे, यांत
शंका नाहीं.
मडके बुवांचे पूर्ण नांव श्री. गणपत महादेव जाधव असें होते. परंतु या नांवानें ते फारसें परिचित नव्हतें, कित्येकांना श्री जाधव हें नांव माहितही नसेल. मात्र, ' मडकें बुवा ' हे नांव माहीत नाहीं अशी एकही व्यक्ति दलित समाजांत सांपडणें शक्य नाहीं. एवढेंच नव्हे तर, धनाजी जाधवांचे नांव ऐकल्याबरोबर शत्रूच्या घोड्यांना देखील पिण्याच्या पाण्यांत धनाजी जाधव दिसत असे, त्या प्रमाणें, डॉ. बाबासाहेबांचे विरोधक, अस्यृश्यांमध्ये भेदनीति पेरणारे फुटकळ मजूर पुढारी; गोरगरिबांना नाहक छळणारे रानवट पोलीस अधिकारी; व अस्पृश्य नोकरवर्गांस हिडीस फिडीसपणें वागविणारे म्युनिसिपल कमिशनर या सर्वाना मडकेबुवा हें नांव ऐकल्यावर कसला तरी धाकंदायक वचक बसत असें. कोणाचीच बिशाद नव्हती मडके बुवांचे शब्द ओलंडून जाण्याची ! मडके बुवा हे फर्मानांचे, आज्ञेचे एक * कोड ' च बनले होते. मडके बुवा म्हणजे, टिच्चून दारूगोळा भरलेली मोठी तोफच होती. त्या तोफेच्या फैरीत सांपडलेला विरोधक वा अधिकारी बेचिराख होत असें.
श्री. जाधव या नावाऐवजी मडके बुवा हें नामाभिधान अधिक प्रस्तृत व लोकमुखी होण्याचें पहिले कारण असें कीं ते पूर्वी बुवा होते. ते माळकरी
होते. भगवी वस्त्रें देखील ते पूर्वी पेहरित असत. त्यावेळीं ते निव्वळ बुवा
म्हणूनच ओळखले जात. परत १९२९ सालीं आफ्रिकेतून आल्यावर त्यांनी