परिशिष्टे "पप
१
मुंबईस ज्यावेळीं मडकी विकण्याचा व्यापार सुरु केला तेव्हांपासून ते * मडके बुवा ' म्हणूनच परिचित झाले.
कै. मडके बुवांचे शिक्षण झालेले नव्हते; ते स्वतःची ठराविक घोटीव सही करीत असत. ते अशिक्षित होते; परंतु ते अज्ञानी मात्र नव्हते. त्यांना गुजराथी, उर्दू, मराठी वगैरे भाषा चांगल्याच अवगत होत्या. त्यांचे पाठांतर तर केवढें अचाट होते. संत तुकाराम, नामदेव, चोखामेळा यांचे अंभग ते अस्खलितपणें म्हणून दाखवित असत. परंतु, असे अभंग veya करण्यात प्रसंगाची समयोचितता व हातोटी त्यांच्यामध्यें दिसून येई. उगीच कांही तरी तोंडपाठ आहे, म्हणून कांहीतरी उतारे ते देत नसत. त्यांच्या दृष्टांतात मार्मिकता होती. कधीं कधीं असें दृष्टांत संताच्या संप्रदायातील असत: तर कधीं व्यवहारांतील पण गांवंढळही असत.
त्यांना मेकॅनिक्सचे अत्यंत उत्कृष्ट काम येत असें. त्या कसबावर फिदा होऊनच कीं, काय, एका गोऱ्याने बॉयलर मेकर म्हणून त्यांना आफ्रिका देशास १९२८ सालीं नेले होते. बॉयलर मेकरची जागा ३००-४०० रुपये दरमहा पगाराची होती. परंतु आफ्रिकेंत त्यांचे गोऱ्या बरोबर फारसें पटलें नाहीं म्हणून एक वर्षाने १९२९ ला ते परत मुंबईस आले.
कै. मडके बुवांचे वक्तृत्वही चांगले होतें. त्यांच्या करड्या आवाजांत एक तर्हेचा मुरब्बीपणा असे. दररोज जीवनांत ज्या ठेंचाखोंचा खाव्या लागत त्याची उदाहरणे घेऊन अडाण्यातील अडाणी माणसाला आपल्या ग्रामीण भाषेंत डॉ. बाबासाहेबांचे तत्वज्ञान अचूकपणें ते समजाऊन सांगत असत.
त्यांच्या अंगी संघटना चातुर्य फार मोठें होतें. त्यांच्या संघटना चातुर्याच्या शक्तिबद्दल डॉ. बाबासाहेबांचा मोठा विश्वास होता. म्हणून मुंबईच्या दलित चळवळीची सूत्रें कै. मडकेबुवा यांच्या हवाली डॉ. बाबासाहेबांनी केली होती.
पण या सर्व गुणांत सर्वश्रेष्ठ असा त्यांचा गुण म्हणजे, आपले परमपूज्य पुढारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील निस्सिम भक्ति. ते नेहमी म्हणत, “ बाबासाहेब माझा देव आहे. माझा देव कधींच चुकणार नाहीं. माझ्या देवाच्या मनांत कधीं वाईट साईट येत नाहीं. त्यांच्यावरील माझी निष्ठा ढळणार नाहीं. त्यांच्या पायाशेजारीच मला मरण यावे.”
या अथांग निष्ठेतच त्यांच्या कर्तृत्वाची शक्ति व नांवलौकिक सामावलेली दिसून येतील. ।