परिशिष्टे - Page 600

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५५८

कोण आहे ? बुवांचा बुवांच्यामध्यें कांही दुर्गुणही होते. परंतु सर्व सदगुणी

दोषांमुळें कांही जणांची त्यांच्यावर स्वभाव करडा असल्यामुळें व त्यांच्या कांही

चांगलीच गैरमर्जी झाली होती आणि ते कांहीसे स्वाभविकही होते. त्यामुळें

निवडणुकीसाठी त्यांना शेवटी अप्रीयपणा पत्करावा लागला. म्युनिसिपालिटीच्या ते चार वेळा तरी उभे राहीले असतील पण कधीच निवडून आले नाहींत. एवढेंच नव्हे तर त्यांना अस्पृश्यांची देखील जेमतेम मतें मिळत हें एका दृष्टीनें ते लोकांतून उतरल्याचें लक्षण होते. परंतु त्यांनी वैतागानें कधींच निष्ठा ढळू दिली नाही, की कधीच पक्षाशी बेंइमानीपणा केला नाही, की कधीच आपल्या

हितशूत्रकडे पक्षाची तत्वें गहाण म्हणून त्यांनी टाकली नाहींत. स्वतःपेक्षा पक्ष

थोर होता, त्याहीपेक्षा डॉसाहेब त्यांना थोर होते.

असा एक कार्यकर्ता आपल्यामधून गेला आहे. त्यामुळें आपली मोठीं हानी

झालेली आहे. याची सर्वांना खात्री पटेल. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अचूक किंबहुना अधीक ged स्पष्टीकरण करणारा एक कार्यकर्ता गेला, त्यामुळें निर्माण झालेली पोकळी त्यांच्या इतक्याच अगर अधिक निष्ठावंत

कार्यकर्त्यांने भरून निघेल, तरच पक्षास मजबुति येईल. |

कै. बुवांच्या कुटुंबावर जी आपत्ती कोसळली आहे, त्यांत आम्हीं सहभागी

आहोंत. मृतात्म्यास शांति मिळो ! बुवा गेले !!

जनता : ता. ३ एप्रिल १९४८.