परिशिष्टे ५५७
असल्यामुळें मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी मडकेबुवांनी शर्थीने
डॉसाहेबांना व मोटारीस बाहेर काढले.
परंतु याहीपेक्षां अधिक चिरस्मरणीय असे कार्य त्यांनी दोन संस्थांमध्ये केलेलें
आहे. त्या दोन संस्था म्हणजे मुंबई शहराचें शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशन व
मुंबई म्युनिसिपल कामगार संघ या होत. फेडरेशनच्या प्रभावी संघटनेचे बरेच
श्रेय कै. मडकेबुवांकडे जाते. फेडरेशन स्थापन झाल्यापासून ते शेवटपर्यंत
मुंबई व उपनगर शाखेचे ते अध्यक्ष होते. म्युनिसिपल कामगार संघाचेही ते
सेक्रेटरी होते. त्यांची अशी खात्री झाली होती कीं, कांहीही मजूर शास्त्र
सांगो, गलिच्छ कामें करणाऱ्या अस्पृश्य कामगारांचा प्रश्न अत्यंत भिन्न, बिकट
व अतिशय महत्वाचा आहे. तो सोडविण्यासाठी अगदीच वेगळ्या स्वरुपाची
व्यवस्था झाली पाहिजे. म्यु. कामगार संघ मजबूत व्हावा म्हणून त्यांनी अनेक
खस्ता खाल्ल्या; अनेक क्लुप्त्याही योजिल्या.
शंभर टक्के सभासद त्यांनी करुन घेतले. या प्रकारच्या मजुराच्या प्रश्नास
त्यांनी चातुर्याने सामाजिकही रूप देऊन ज्ञातिबांधवास आळवून दटावून त्यांनी
झाडून कामगारांना सभासद करून घेतले. तसेंच ज्या कामगारांच्या व्यक्तिगत
अडचणी असतील त्या दूर करण्यासाठीं त्यांनी जातीनें लक्ष घातलें. तसेंच
कामाव्यतिरिक्त इतर बाबीसंबंधानें गुन्हा शाबिदी झाल्यामुळें कामगारांच्या नोकरीवर
जी गदा येत असे, ती ते दूर करीत असत. मुंबई म्युनिसिपल कामंगार संघ ही संस्था इतकी कीर्ति पावलेली व नमुनेदार म्हणून गणली गेली होती की,
ऑल इंडिया म्युनिसिपल कामगार संघाचे लोक बुवांचे ऑफीस पहाण्यास आले:
होते. म्युनिसिपल कामगारांच्या बाबतीत, बुवांचे धोरण कधीच पडखाऊ TË. या बाबतींत ते भारीच एकेरी होते. संघामार्फत त्यांनी (इतर सहकाऱ्यांसह)
WER जे कांही कामगारांना मिळवून दिले आहे, त्याचा नमुना याच अंकात
पहिल्या पानावर दिला आहे. बुवांनी संपाची नोटिस दिली कीं, म्युनिसिपल अधिकार्यांचे धाबे दणाणत असत. कारण बुवांना दुखवून संप ओढवून घ्यावा, तर ड्रेनेजची कामें अडून राहून म्युनिसिपल अधिकाऱ्यांसह सर्व मुंबई गटार गंगेत उभी न्हाऊन निघेल याचे ' स्वच्छ ' (?) चित्र त्यांच्या पुढें उभें राही. म्हणून बुवांची विनतवारी करण्यास म्यु. कमिश्नर बुवांच्या ऑफिसवर व घरी खेटे घालीत "असत. बुवांनी म्यु. कामगारास जे हक्क मिळवून दिलेत, त्याबद्दल, मयु. का. संघाचे उपाध्यक्ष श्री. दोंदे यांचेजवळ भाई मिरजकर सारख्या कम्युनिस्टानें . असें उद्गार काढले होते कीं, “ कोठल्याच कामगार संघटनांना कामगारांसाठी जे आजपर्यंत कांही मिळविता येणे अशक्य झाले आहे ते बुवांनी मिळविले आहे. ”
वाय ६४१-३८