परिशिष्ट-२५
सार्क्सवाद
मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतिवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) . याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड़िख Wey याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्त्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. औद्योगिक क्रांती झाली आणि वाढत्या उद्योगाबरोबर कामगारांची व सामान्य जनतेची परिस्थिती अधिकाधिक हलाखीची बनत गेली. तेव्हा म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या 'शतकाच्या सुरुवातीच्या काळात समाजसत्तावादाचा उदय व प्रसार झाला. त्या वादाचा इंग्लंड व फ्रान्स मध्ये अनेक नामवंत विद्वानांनी व समाजधुरीणांनी जोरदार पुरस्कार केला. त्या विचारवंतांमध्ये रॉबर्ट ओएन, चार्ल्स फौरिएर, प्रूदाँ, सेंट सायमन वगैरे प्रमुख होते. त्या विचारांना कार्लाइल, डिकन्स, रस्किन आदी लेखकांचाही पाठिंबा होता. या समाजसत्तांवादाच्या प्रणेत्यानी केवळ समाजसत्तावादी समाजाचे भव्य चित्र रेखाटले. तो अस्तित्वात आणण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग दाखविला नाही. म्हणून त्यांना यूटोपिअन (अस्थितादर्शवादी) म्हटले जाते.
मार्क्सवाद एकोणिसाव्या शतकात वाढला. त्याचे पहिले विशदीकरण १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या साम्यवादी जाहीरंनाम्यात (द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत) आढळते. जाहीरनामा मार्क्स व एंगेल्स दोघांनी मिळून लिहिला; पण त्यात मार्क्सचाच अधिक हात होता.
कामाचा दिवस शक्य तितका वाढवून आपल्या मर्जीनुसार कामावर लावलेल्या मजूराला पगार देणे व आपला नफा वाढवणे हे भांडवलदारांचे धोरण होते. या व्यवस्थेविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र असंतोष माजला होता. तो असंतोष फुलवून त्याचे क्रांतिकारक उठावात रुपांतर करंता येईल, अशी मार्क्सची, त्याच्या मित्रांची व इतर समाजवाद्यांची कल्पना होती. १९४८ हे युरोपमधील क्रांतीचे वर्ष. त्यावर्षी यूरोपमधील अनेक देशांत क्रांतीकारक उठाव झाले. त्या उठावांत सामील होण्याचे आवाहन साम्यवादी जाहीरनाम्याने कामगारांना केले. जाहीरनाम्याच्या शेवटी मार्क्स लिहितो, “ जगातील कामगारांनो, एक व्हा; शुंखलांखेरीज तुमच्या जवळ गमावण्यासारखे असे दुसरे काही नाही,”
उत्तर वयात त्या तत्त्वांचा पारेपोष करणारी मार्क्सने अनेक विद्ठत्ताप्रचुर पुस्तके व पुस्तिका लिहिल्या. त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो तीन खंडी कॅपिटल