५७२ Si. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कामगारांची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे वर्गकलह हा मर्यादित प्रमाणातच तेथे चालतो. त्यांची राहणी सुधारली आहे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते सुधारले आहेत. त्यांच्यासाठी कल्याणाच्या अनेक सोई व कायदे झाले आहेत.
मार्क्सवादाविरुद्ध हल्ली खूप टीका होते. ती टीका केवळ भांडवलशाही मानणाऱ्यांकडून होते असे नाही. खुद्द मार्क्सवांद्यामध्ये देखील त्या तत्त्वज्ञानावर टीका करणारे पुष्कळ निघाले आहेत. रशिया इ. साम्यवादी देशांत मार्क्सवादाविरुद्ध टीका करणे शक्य नाही; पण तिथेही काही धाडसी टीकाकार निर्माण झाले आहेत; त्यांना अर्थातच शासनाच्या रोषाला बळी पडावे लागले.
भारतातील पहिले प्रसिद्ध मार्क्सवादी एम्. एन्. रॉय यांचाही या बाबतीत उल्लेख करता येईल. वर्गवादासध्ये गुंतून पडल्यामुळे मार्क्स व्यक्तीला विसरला, हा त्यांनी घेतलेला आक्षेप मूलगामी स्वरूपाचा आहे. मार्क्सवाद्यांमध्ये एक अधिक जहाल व क्रांतीकारक गट निर्माण झाला आहे. त्याला “न्यू लेफ्ट ' असे म्हणतात. त्यामध्ये हर्बर्ट मार्क्यून, चे गेव्हेरा, झा पॉल सार्त्र, फ्रान्स फनान इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या दृष्टीने विकसित देशांतील औद्योगिक कामगार आता क्रांतिकारक राहिला नाही; तो क्रांतीकारक वारसा ते तिसऱ्या जगातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, विद्यार्थ्यांना व इतरांना देतात. काही टीकाकार मार्क्सच्या उत्तर आयुष्यातील विचारापेक्षा पूर्वायुष्यातील विचारांना अधिक महत्त्व देतात. त्या विचारांत सर्वात महत्त्वाचा विचार आहे, तो परात्मवादाचा (एलिएशनचा); त्यांमध्ये मानवतावाद देखील आहे. तोच खरा मार्क्सवाद असेही त्यांच्यापैकी काही जण म्हणतात.
मराठी विश्वकोष : १३, पृ. ३८२-३८५.