व्यक्ती, संस्था, कार्य--सूची
अय्यंगार श्रीनिवास एस (१८७४-१९४१) :---एक हिंदी कायदेपंडित. शिक्षण मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजात. मद्रास हायकोर्टाचे अँडव्होकेट. मद्रास युनिव्हर्सिटीच्या सीनेटचे सभासद. सोशल रिफॉर्म असोशिएशनचे अध्यक्ष, कांग्रेसचे द मध्यवर्ती असेंब्लीचे सभासद. १९२६-२७ साली राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष. १९२९ मध्ये ईंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीगचे अध्यक्ष.
अली इमाम, सर (१८६९-१९३२) :-हिंदुस्थानातील राष्ट्रीय मुसलमान पक्षाचे संस्थापक व बिहार प्रांतातील सुप्रसिद्ध कायदेपंडित, यांची गणना अखिल भारतीय हिंदी पुढाऱ्यात होई. जन्म बिहारमधील अच्हा गावी. कॉलेज कोर्स करण्यापूर्वीच हे इंग्लंडला बॅरिस्टर होण्याकरिता गेले व तेथे बॅरिस्टर झाले. यावेळी काँग्रेसतर्फ इंग्लंडमध्ये एक शिष्टमंडळ गेले होते. त्यात जॉर्ज यूल, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, मुधोळकर, अर्डले नॉर्टन व सर मोरोपंत जोशी हे होते. या मंडळींबरोबर काम केले. पुढे यांनी पाटना येथे वकिली सुरू केली (१८९०). १९०८ मध्ये बिहार प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष व त्याच वर्षाच्या शेवटी अमृतसर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयाची कल्पना काढणारे सर सय्यद अहमद यांच्या मनाची छाप प्रथम यांच्यावर होती. तथापि, घर्म व समाज यांच्या हितायरोबर राष्ट्राकडे आपले लक्ष असले पाहिजे, असे त्यांचे मत होते. १९१०-१९१५ पर्यंत व्हॉईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते. कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या पदावर काही महिने काम केले (१७१७), लीग ऑफ नेशनमध्ये हे हिंदुस्थानचे पहिले प्रतिनिधी म्हणून हजर होते (१९२०). निजामाच्या हैद्राबाद संस्थानात तीन वर्षे दिवाणपद भूषविले. सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्यात त्यांनी भाग घेतला. सर्वपक्षीय परिषदेत प्रामुख्याने भाग घेऊन नेहरू रिपोर्ट तयार करण्यात सहकार्य केले. यानंतर मुसलमानांनी संयुक्त मतदार संघाची मागणी करावी, अशा मताचा पुरस्कारही त्यांनी केला व त्यासाठी राष्ट्रीय मुस्लीम पक्षाची स्थापना केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेक्ररिता ते गेले होते. लखनौ येथे झालेल्या नॅशनॅलिस्ट मुस्लीम कॉन्फरन्सचे हे अध्यक्ष होते (१९३१).
आर्य समाज-पाहा स्वामी दयानंद सरस्वती.
इसापनीती :--इसाप नावाचा एक ग्रीक गुलाम इ. स.धूर्दी ६२० ते ५६० या काळात होउन गेला. तो अत्यंत कुरुप परंतु स्वभावाने कुशाग्र बुद्धीचा होता