व्यक्ती, संस्था, कार्य--सूची ५८३
असे म्हटले जाते. तो आपल्या मालकाच्या छोट्या मुलांना पशुपक्षांच्या विविध बोधकथा सांगत असे. त्या साऱ्या कथा नीतितत्ठावर आधारित असत. त्यांचा संग्रह 'इसाप फबल्स' (इसापनीती) म्हणून प्रसिद्ध आहे. जगातील सर्व भाषात इसापनीतीच्या कथा अनुवादित झाल्या आहेत. ह्या नीतिकथांचा मुखवटा बराचसा बुद्धाच्या "जातककथा ' शी किंवा 'पंचतंत्रा तील कथांशी मिळता- जुळता आहे.
कबीर; महात्मा (१४२५-१५०५) :---बहुजन समाजाच्या दृष्टिकोणातून समाज परिवर्तनाचे कार्य फारच कणखरपणे केले, ते मूर्तिपूजा, जातिव्यवस्था, पुरोहितवाद व त्यांच्याकडून होणाऱ्या विधी इत्यादिच्या विरोधी होते. त्यांच्या उपदेशाचा केंद्रबिंदू मानवतावाद, वैज्ञानिकत्ता, बुद्धीदाद होता. ते म्हणतात, “ जर दगडाची जा केल्यास देवदर्शन घडत असेल तर मग मी पहाडाची पूजा करतो. जर स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होत असेल तर बेडकाला सर्वाच्या अगोदर मोक्षप्राप्ती
[वयास पाहिजे. जर नग्नावस्थेत राहिल्याने ईश्वर प्राप्त होत असेल तर हरिणांना सर्टाच्या अगोदर ईश्वर प्राप्त व्हावयास पाहिजे, अनुष्य शेकडो पुस्तके वाचून पंडित होत नाही. पंडित तोच आहे की ज्याला फक्त अडिच शाब्द ` प्रेम ' या पूर्ण शब्दाची जाणीव आहे. महामानव कबीरांचे विचार निश्चितच क्रांतीकारी आहेत आणि म्हणूनच बहुजन समाजात कबीर पंथीय लोक बऱ्याच प्रमाणात होते आणि आहेत, डॉ. आंबेडकर म्हणतात, “ माझे दुसरे गुरू कबीर होत. माझे वडील कबीर पंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवमाया आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कडीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले. मी मोठा कोणालाच म्हटले नाही. गांधीना मी महात्मा म्हटले नाही. कारण कबीराने म्हटले आहे “माणूस होना कठीण है । तो साधू क्या बने ।” जो माणूस झाला नाही, तो महात्मा कसा होईल ? ” (खंड १८, भाग - ३, पृ. ४०२) जर डॉ. आंबेडकरांनी महात्मा कडीरांना आपले गुरू म्हणून घोषीत केले नसते तर कबीरांच्या जीवन आणि कार्याला जो उजाळा मिळत आहे तो मिळाला नसता; ते काळाच्या ओघात नष्ट झाले असते.
कांबळे ; शिवराम जानबा :--बाबा वलंगकर यांची चळवळ. विटाळविध्वंसन अस्पृश्तानिवारण करण्याविषयी आखलेली होती. त्या चळवळीने त्यांनी अस्पृश्य समाजात नवे युग सुरू केले. त्यांनी आपल्या जीवंत वाणीने व लेखणीने त्या वेळच्या तरुण अस्पृश्य पिढीच्या अंतःकरणात सामाजिक, धार्मिक, आर्थिक इत्यादि प्रकारच्या गुलामगिरीच्या [जाळ्यातून ] [बाहेर ] [पडण्याची ] [प्ररणा ] [उत्पन्न ]