२०-७-१९२७ महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप निराधार - Page 100

पुट डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

इतकेही असून जर महारेतर जातींना महारांपासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहू नये अशी माझी विनंती आहे. काही ब्राह्मण अस्पृश्योद्धाराकरिता झटतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी पुष्कळसे ब्राह्मण-ब्राह्मणेतर पक्षापेक्षा आपला पक्ष बलवान करण्याकरिताच अस्पृश्यांना जवळ करतात असे मला वाटते. आमच्या उद्धाराकरिताच केवळ नि:स्वार्थ बुद्धीने जो ब्राह्मण अथवा मराठा प्रयत्न करील तसा आम्हास हवा आहे. आम्हास दुसऱ्यांच्या हातातील कोलीत होण्याची इच्छा

| नाही.

` स्वार्थी बुद्धीने प्रेरित झालेल्या लोकांकडून अस्पृश्यता निवारण कार्य झाले तरी एक वेळ चिंता नाही, कारण अस्पृश्य राहून मिळणाऱ्या सवलतीच्या सहाय्याने आमची उन्नती करून घेणेच आम्हास सुलभ होईल असे मला वाटते. अस्पृश्यतानिवारण करण्याचा रा. माटे यांचा खरोखरी उद्देश नाही असे मला वाटते. अस्पृश्यांना जवळ करून ब्राह्मणेतरांना शह देण्याची त्यांची खटपट आहे. अशी माझी समजूत आहे. रा. माटे यांनी माझी समजूत चुकीची आहे, असे सप्रमाण सिद्ध केल्यास मी cael अवश्य सहकार्य करीन.

मुसलमानापासून बचाव व्हावा म्हणून अस्पृश्यतानिवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे असे मला वाटते. अशा स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे की, त्यांनी कोणाच्याही कच्छपी लागू नये. मि. सकट यांनी

दे दान सुटे PRO” असे ओरडून भीक मागितली तरी मला वाईट वाटणार नाही. पण ते जर रा. माटे यांच्या नादी लागतील तर मला अत्यंत खेद होईल. निराळे रहा; पण दुसऱ्यांचे बगलबच्चे होऊ नका एवढेच माझे त्यांना सांगणे आहे.

महार जातीचे पुढारीच कीन्सिलमधील जागा बळकावून बसतात असा आमच्यावर आक्षेप आहे. अस्पृश्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरिता कौन्सिलात लायक माणसेच जाणे इष्ट नाही काय ? महारेतरात माझ्यासारखा माणूस जन्माला आलेला नाही हे त्यांचे दुर्दैव होय. परंतु मला कौन्सिलच्या जागेची अभिलाषा नाही. महारेतरात जर जास्त लायक माणूस असेल तर त्याने खुशाल माझी जागा घ्यावी. मी आताच्या आता येथूनच राजीनामा पाठविण्यास तयार आहे. मी कौन्सिलमध्ये जेव्हा जेव्हा फक्त महार जातीच्या हिताकरताच झटतो आहे असा तुम्हास संशय येईल तेव्हा तुम्ही मला पत्राद्वारा आपल्या शंका जरूर कळवा म्हणजे मी सर्वाच्या शंकांचे ताबडतोब निरसन करीन.