महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप निराधार ५७
अस्पृश्यांकरिता वसतिगृह काढले आहे. त्यास चांभारांनी मदत दिलेली नाही. तरी पण महार-मांग, चांभार वगैरे सर्व जातीतील मुले त्या गृहात आम्ही घेतली आहेत. "' आणखी मांग विद्यार्थी त्या गुहात आपण जरूर पाठवा “ अशी मी, मि. सकट यांना समक्ष विनंती केली आहे. त्याचप्रमाणे नाशिक व जळगाव येथ वसतिगृहे काढून महार व महारेतर जातींच्या उन्नतीकरिता आम्ही सदोदीत झटत आहोत. असे असताना महार जातीविरूद्ध गिल्ला करण्यात काय हशील आहे, हे आम्हास समजत नाही.
सरकारकडून मिळणाऱया सवलती अस्पृश्य जातीत योग्य प्रमाणात वाटल्या न जाता फक्त महार जात आप्पलपोटेपणा करून सर्व सवलती बळकावून बसते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मुंबईत मि. निकाळजे नावाच्या महार जातीतील गृहस्थास मुंबई कॉर्पोरेशनमध्ये नॉमिनेट केले होते; पण अखिल अस्पृश्य वर्गाची त्यांच्या हातून उन्नती व्हावी तशी होत नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा ` त्यांची जागा चांभार जातीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मि. बाळू यांना मीच सरकारकडून देवविली. सातारा शहरात महार लोकांची पुष्कळ वस्ती असूनसुद्धा येथीजञ म्युनिसीपालिटीत सरकार नियुक्त सभासद चांभार जातीतीलच आहे. हया सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या असता महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप किती फोल आहे, हे दिसून येण्यासारखे आहे.
काही अज्ञानी महार लोक व्यापक दृष्टीचे नसतील. पण येवढ्याच कारणावरून अखिल महार जातीस दूषण लावणे चांगले नाही. महार जातीतील पुढारी काय करतात हे अवलोकन करा आणि नंतर दूषणे देण्यास पुढे या असे माझे इतर जातीतील लोकांना आग्रहाचे सांगणे आहे. मी स्वतः भांग जातीशी रोटी-बेटी व्यवहार करावयास तयार आहे. अशी स्थिती असताना महार-मांगांना तेढ का असावी हे समजत नाही. मी स्वतः माझ्या घरी मांगाचा एक मुलगा पोटच्या पोराप्रमाणे पाळला होता. अजून कोणी मला जर एखाद्या मांगाचा मुलगा आणून देईल तर मी त्याचे पालनपोषण करीन. आम्ही नुसते बोलके पुढारी नसून प्रत्येक गोष्ट कृतीत करून दाखवितो. काँग्रेसच्या अधिवेशनात जेवणाच्या वेळी जातीनिहाय निरनिराळे तट [असतात. ] परंतु माझ्या नेतृत्वाखाली भरलेल्या बहिष्कृत परिषदेच्या वेळी सर्व जातीचे भोजन [एकाच ] [ठिकाणी ] [झाले ] ह्यावरून जाती जातीत ऐक्यभाव [उत्पन्न ] [करण्याचे ] [आम्ही ] [किती ] [प्रयत्न ] [करीत ] आहोत यासंबंधीची चांगलीच कल्पना येईल.