१४
अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी
अमरावती येथील इंद्रभुवन थिएटरात वऱ्हाड प्रान्तिक अस्पृश्य परिषदेचे, दुसरे अधिवेशन दिनांक १३ व १४ नोव्हेंबर १९२७ ला आयोजित करण्यात आले होते.
दिनांक १३ नोव्हेंबर १९२७ रोजी सभेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बडनेरा मुक्कामी श्री. गवई, एम. एल. सी. यांनी स्वागत केल्यावर अध्यक्ष व इतर मंडळी बरोबर दुपारी १-३० वाजता अमरावती मुक्कामी पोहचली. स्टेशनवर स्वागतार्थ स्पृश्यास्पृश्यांचा बराच मोठा समुदाय जमला होता. सभेच्या कामास बरोबर साडे तीन वाजता सुरुवात झाली. प्रथमतः अस्पृश्य वर्गपैकी काही मुलांनी गोड व मंजूळ आवाजात स्वागतपर पदे म्हणून दाखविली व डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांनी, लवकरच होणार असलेल्या श्रीअंबादेवी मंदीराच्या सत्याग्रहाच्या दृष्टीने आजच्या सभेचे महत्त्व प्रतिनिधींना समजावून सांगितले व नंतर डॉ. आंबेडकर ह्यांची ओळख करून देऊन त्यांना त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. त्यास मोर्शचि सुप्रसिद्ध ब्राह्मणेतर पुढारी नानासाहेब अमृतकर ह्यांनी दूजोरा दिला व सत्याग्रह कमेटीचे चिटणीस श्री. नाईक व अध्यक्ष श्री. गवई, एम्. एल्. सी. ह्यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. आंबेडकर हे टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्थानापन्न झाले. त्यांनी सुरवातीला आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आपल्याला दिल्याबद्दल स्वागतमंडळाचे व प्रतिनिधींचे आभार मानून, आपले भाषण केले.
ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
न जानपदिकं दुखमेकः शोचितुमर्हति |
अशोचन्प्रति कुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ॥
' जे दुःख सार्वजनिक आहे त्याचा शोक करीत बसणे योग्य नाही. त्यासाठी रडत न बसता त्याच्या प्रतिकारार्थ आपणाला इलाज सुचेल तर तो ज्ञानी पुरुषाने करावा."
अपहाय निजं कर्म कुष्ण कृष्णेति वादिनः।
ते हरेद्वेषिणः पापाः धर्मार्थ जन्म यद्धरेः I
आपले कर्म सोडून केवळ “हरि SR’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे व पापी होत कारण, हरीचा जन्म तरी धर्मरक्षणार्थच आहे
बहिष्कृत भारत : २५ नोव्हेंबर १९२७.