६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्य व स्पृश्य हे एकाच धर्माचे लोक आहेत, ही गोष्ट उभयपक्षी मान्य
नाहीत असे म्हणत आहे. स्पृश्य लोक अस्पृश्यांना, तुम्ही हिंदू केव्हाच नाहीत. उलट १९१० सालच्या खानेसुमारीच्या वेळी जेव्हा काही मुसलमान लोकांच्या कारवाईमुळे अस्पृश्यांची गणना हिंदूत करू नये. अशी एक टूम निघाली तेव्हा स्पृश्यांपैकी सुधारकांनीच नव्हे तर सनातनीयांनीसुद्धा अस्पृश्य हे हिंदू आहेत असे एकाच अट्टाहासाने सांगितले. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनीही आपणास अहिंदूत न गणता हिंदुतच गणावे अशी कबुली दिली. आपण एकधर्मीय आहोत, ही भावना उभयपक्षात पुरातन कालापासून चालत आलेली आहे, हे जरी खरे आहे तरी अस्पृश्यांच्या दृष्टिकोनात आज मोठाच फरक पडलेला दृष्टीस पडतो. आपण जर हिंदुधर्मीय आहोत तर इतर हिंदुधर्मीयांना जे हकक आहेत ते हकक आप्रणास का असू नयेत ? ज्या पाणवठ्यावर ते पाणी भरतात त्यावर आपणास का भरता येऊ नये ? ज्या देवळात जाऊन ते पूजा करितात त्या देवळात आपणास का जाता येऊ नये ? अशा प्रकारचे समानतेचे प्रश्न ते पुढे करीत आहेत व त्या प्रशनांनुरूप जे हक्क त्यांना प्राप्त झाले पाहिजेत ते प्राप्त करून घेण्याचा आग्रह धरण्यास ते प्रवृत्त झाले आहेत. कोणीही मनुष्य जुने सोडून नव्याच्या मागे लागला तर जे आपण करतो ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे, याविषयींचा संशय त्याच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. जुने हे परंपरेने पुनीत झालेले असते व म्हणून सर्वाना त्याच्या सत्यतेबद्दल खात्री वाटते. नव्याला परंपरा नसते आणि म्हणून ते दिसावयास कितीही गोंडस असले टी त्याचे अनुकरण करण्यास लोक कचरतात. समान हक्काचा आग्रह धरणाऱ्या अस्पुश्यांचीही या नवीन धोरणाच्या बाबतीत अशाच प्रकारची मन:स्थिती असणे अगदी साहजिक आहे. यापूर्वी आपण कधी देवळात गेलो नाही! कधी पाणवठ्यावर गेलो नाही । तसे करण्याचा आपण आग्रह धरावा असे लोक म्हणतात, परंतु आपला हा आग्रह सत्याग्रह होईल काय अशी जर शंका . अस्पृश्यांच्या मनात उद्भवली तर ती मनुष्य स्वभावास धरूनच होईल. कारण कोणत्याही कार्यात यश प्राप्ती होईल किंवा नाही, हे जितके साधनसामग्रीच्या प्रमाणावर अवलंबून आहे तितकेच ते कार्याच्या नैतिक स्वरूपावरही अवलंबून आहे. कार्याच्या मुळाशी जर सत्य असेल तर त्यात यशप्राप्ती होण्यास चिंता करण्याचे विशेष कारण उरत नाही. कारण अखेर सत्याचा नेहमीच जय होतो. तेच कार्याच्या मुळाशी असत्य असेल तर त्यातील यशप्राप्ती कठीण जाते. यास्तव आपल्या कार्याचे नैतिक स्वरूप काय आहे याची दरेक अस्पृश्याने पूर्ण ओळख करून घेतली पाहिजे. ती ओळख व्हावी म्हणून देवळात जाण्याचा अस्पृश्यांचा आग्रह सत्याग्रह आहे किंवा दुराग्रह आहे याचा विचार करणे आवश्यक
आहे.