१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 107

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी . ` gy

सत्याग्रहाच्या बाबतीतील पहिली गोष्ट म्हटली म्हणजे सत्यं कॉणते व असत्य कोणते हे ठरविणे ही होय. कारण सत्य म्हणजे काय हेच जर निश्‍चितपणे | ठरविता आले नाही, तर सत्याग्रहाची इमारत केव्हाही डळमळीतच राहणार.'' 'आपला' आग्रह सत्याग्रह आहे की: नाही या विषयी GR सत्याग्रही माणसाची खात्री नसेल तर त्याच्या हातून सत्याग्रह पार कसा पडणार ? कारण सत्याग्रहातील यंशप्राप्ती . नेहमीच सत्याग्रही माणसाच्या आत्मबलावर अवलंबून असणार व हेः आत्मबल : त्याच्या ठायी प्रगट होण्यास आपण जे करीत आहोत ते सत्य आहे अशी भावना-- ठाम झाली. पाहिजे: A भावना जर संशयात्मक. असली -तर त्याच्या ठायी सत्याग्रहास अवश्य असलेले आत्मबल "मुळीच प्रगट होणार नाही. म्हणून सत्य म्हणजे काय याची खूण सत्याग्रही माणसास पटणे अवश्य आहे. आमच्या मते - थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य आहे. व त्यासाठी केलेला आग्रह त्यास सत्याग्रह म्हणावे. आता. लोकसंग्रहाच्या : बाबतीत मतभेद होणे शक्य आहे. एकाला जे लोकसंग्रहाचे कार्य ged, तेच: दुसऱ्याला लोकविग्रहाचे कार्य आहे असे वाटेल. तरीपण एक गोष्ट मान्य करावी लागेल Gl Heard बुद्धि जर शुद्ध नसेल म्हणजे स्वार्थमूलक हेतूने जर तो कार्य . करण्यास प्रवृत्त होत असेल तरच लोकविग्रहाच्या कामाकडे. त्याचा कल होईल. तेच कर्त्याच्या मनात जर समभाव जागृत असेल तर त्याच्य़ा हातून. लोकविग्रहाचे. काम . मुळी होणारच नाही. कारण स्वार्थाचा ओढा नसल्यामुळे त्याची वासना लोकसंग्रहाकडेच. असणार म्हणून या दोन तत्त्वाचा आधार घेऊन. जेथे समभाव आहे तेथे लोकसंग्रह. आहे व जेथे लोकसंग्रह आहे तेथे सत्कार्य आहे. . आणि अशा कार्याविषयीचा जो आग्रह तो सत्याग्रह होय, अशी आम्ही सत्याग्रहाची. व्याख्या करतो

ही विचारसरणी आमची नव्हे. आम्ही ती गीतेवरून घेतली आहे.- सत्याग्रहाच्या : बाबलील आम्ही गीतेचा आधार घेतो याचे काही जणांना आश्चर्य वाढेल. - कारण सत्याग्रह हा काही गीतेचा -विषय' नाही अशी साधारणपणे -लोकांची समजूत आहे. पण आमच्या मते. ती समजूत. अगदी चुकीची आहे. सत्याग्रहःहाच गीतेचा मुख्यः प्रतिपाद्य विषय आहे व गीला का -उपदेशण्यातः आली. हे 'चीटपणे ध्यानात घेतले असता आमच्या म्हणण्याची PI: सहज “पटण्यासारखी. आहे. गीतेत अर्जुनाने कोणता प्रश्‍न केला व त्यासं श्रीकृष्णाने काय उत्तर दिले - त्याकडे जर कोणी 'लक्ष पुरंविले तर असे दिसून Ager की, अर्जुन रंथाखाली' बसल्यानंतर, “बसू नकोस, तुझे राज्याधिकार ज्यांनी घेलले त्यांच्याशी युद्ध करण्याचा आग्रह धर“, . असे जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्यास म्हणाला तेव्हा,