१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 108

डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ६६

“ असा अर्जुनाने प्रश्‍न केला व त्या एकच सांग, तुझा आग्रह सत्याग्रह कसा?

एक प्रश्नास गीता हे भगवंताने दिलेले उत्तर आहे. अर्थात या गीता ग्रंथात सत्याग्रहाशिवाय दुसरा मुख्य प्रतिपाद्य विषय असणे शक्य नाही. अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान हक्क मागण्याचा जो आग्रह धरतात तो आग्रह सत्याग्रह आहे किंवा नाही, हे ठरविण्याकरिता जो आम्ही गीतेचा आधार दिला आहे, तो गीता ही सत्याग्रहावर एक मीमांसा आहे, म्हणून तर दिला आहेच. परंतु या कामी गीतेचा आधार देण्याचे दुसरेही एक कारण आहे. ते हे की, हा धर्मग्रंथ उभय पक्षांना-स्पृश्यांना तसाच अस्पृश्यांना-मान्य आहे. अन्य कोणत्याही ग्रंथाचा . आधार जर आम्ही दिला असता तर निमित्तास टेकलेले स्पृश्य लोक यांनी तुमचा आधार आम्हास मान्य नाही असे म्हणावयास मागे पुढे पाहिले नसते. अस्पृश्यांनी आरंभिलेला सत्याग्रह जर गीतेच्या कसोटीस उतरला तर त्यास विरोध करण्यास स्पृश्य लोकांस मुळी तोंडच उरणार नाही. कारण तसे करणे म्हणजे पर्यायाने

गीता अमान्य केल्यासारखेच होणार आहे.

आता हा अस्पृश्यांचा सत्याग्रह गीतेच्या कसोटीस उतरतो की काय हे पाहू. प्रथमतः आपण आरंभिलेले कार्य हे लोकसंग्रहाचे कार्य आहे काय ? अस्पृश्यता ` जाऊन आपण स्पृश्य व्हावे एवढ्या पुरतीच या चळवळीची व्याप्ती आहे असे काही लोक मानितात. परंतु तसे मानणे चुकीचे आहे. अस्पृश्यतेमुळे अस्पृश्यांचेच

नुकसान झाले आहे असे नसून त्यांच्या बरोबर स्पृश्यांचे तसेच देशाचेही अपरिमित नुकसान झालेले आहे. अस्पृश्यतेच्या कलंकाने अस्पृश्यच कलंकीत झालेले

आहेत असे नव्हे तर स्पृश्यही कलंकीत झाले आहेत. ज्यास कमी मानण्यात

येते, त्यात त्यांचा अवमान होतोच पण जे कमी मानितात त्यांचीही नीति

खालावलेली होते. अस्पृश्य लोक अस्पृश्यतेच्या गर्तेतून निघून त्यांचे आत्मस्वातंत्र्य

त्यास प्राप्त झाले तर ते केवळ आपली उन्नती करतीलच, इतकेच नव्हे तर ते

आपल्या पराक्रमाने, बुद्धीने, उद्योगाने देशाच्या भरभराटीस कारणीभूत होतील.

अशा दृष्टीने पाहिले तर अस्पृश्यतानिवारणाची चळवळ ही केवळ पतितोद्धाराची

चळवळ नसून खऱ्या लोकसंग्रहाची चळवळ आहे. अस्पृश्यांना स्वार्थाकडे नजर

ठेवून फक्त आपलाच उद्धार करून घ्यावयाचा झाल्यास सत्याग्रहासारखे खडतर

असिधाराव्रत पत्करण्याचे काहीच कारण नाही. कारण, ज्या माणुसकीसाठी व

ज्या समतेच्या वागवणुकीसाठी ते आज धडपड करीत आहेत ती माणुसकी प्रांप्त

होण्यासाठी त्यांनी जर धर्मांतर केले तर त्यांची कार्यसिद्धी सहज होण्यासारखी

आहे आणि अस्पृश्यता निवारणाच्या कामी ज्या शक्तिचा त्यांना व्यय करावा लागत

आहे, तीच शक्ती त्यांना आपल्या शैक्षणिक व आर्थिक उपयोगाला लावता