१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 110

६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

करीत असतील तर ते खरे नाही. कारण नमाज पढणे हे एकच जसे मुसलमानी धर्मपालनाचे लक्षण आहे, तसे स्पृश्यांच्या देवळातील देवांचे दर्शन घेणे एवढेच काय ते हिंदुधर्मपालनाचे लक्षण आहे असे नव्हे. साकाराचे प्रत्यक्ष पूजन, निराकाराचे ध्यान आणि परमेश्वराचा नुसता नामोच्चार असे उपासनेचे विविध मार्ग हिंदू धर्मात सांगितलेले आहेत. या उपासनेपैकी, कोणतीही उपासना अस्पृश्यांनी करू नये असे आम्ही काही म्हणत नाही; व त्यापैकी कोणतीही एक केली तरी हिंदुत्वाला ती पुरेशी आहे. उपासनेचे, उपास्याचे नानाविध प्रकार जोपर्यंत हिंदू समाजात रूढ आहेत तोपर्यंत स्पृश्यांच्या देवळात गेल्यानेच उपांसंना घडते ह्या अस्पृश्यांच्या म्हणण्यात काही अर्थ नाही असे त्यांना वाटते. या आक्षेपकास आमचे उत्तर असे आहे की हिंदू समाजात उप्नासनेचे नानाविध प्रकार आहेत आणि त्यापैकी कोणत्याही एका प्रकारची उपासना केली तरी हिंदुधर्मपरिपालन घडते असे जरी मान्य केले तरी ज्या कोणास साकाराचे प्रत्यक्ष पूजन करावेसे वाटत असेल त्याला तशा प्रकारची मोकळीक का असू नये ? हा उपासनेचा मार्ग एकास खुला तर तो दुसऱ्यास बंद का असावा ? आणि ज्या अस्पृश्यांना तो बंद आहे त्यांनी तो खुला करून घेण्याचा आग्रह धरिला तर तो वाजवी होणार नाही काय ? उपासनेचे नानाविध प्रकार जेथे असतील तेथे दर एक व्यक्‍तीला स्वत: साठी उपासनेचा योग्य प्रकार कोणता हे ठरविण्याचा हक्क असलाच पाहिजे. अस्पृश्य लोक जे भांडत आहेत ते या हक्कासाठी भांडत आहेत. त्यांची बाजू लंगडी. आहे असे म्हणणे शुद्ध लपंडाव आहे.

`या विरोधी लोकांचा दुसरा असा कोटीक्रम आहे की, स्पृश्य लोक आपल्या देवळात येऊन अस्पृश्यांना देवदर्शन घेऊ देत नसले तरी देव ज्याचा त्यास स्थापण्यास स्वातंत्र्य आहेच. ज्या अस्पृश्यास साकाराचे प्रत्यक्ष पूजन हा उपासनेचा मार्ग पसंत असेल त्यांनी निराळा देव स्थापन करावा. 'स्पृश्य हिंदू समाजाने हे स्वातंत्र्य त्यांना दिले आहे. केवळ उपासनेसाठी अस्पृश्यांना स्पृश्यांच्या देवावर हक्क सांगण्याचे काही कारण नाही. हा कोटीक्रम जे पढतमूर्ख लढवितात त्यांना आमचा असा सवाल आहे की, रेल्वे अधिकाऱ्यांनी जर गोऱ्या लोकांसाठी निराळे व काळ्या लोकांसाठी निराळे आगगाडीचे डबे राखून ठेवले तर ती व्यवस्था तुम्हाला का मान्य नाही व त्याविरूद्ध तुम्ही तक्रार का करता ? रेल्वे अधिकाऱ्यांनी जरी गोऱ्या लोकांकरिता निराळा डब्बा राखून ठेवला असला तरी इतर डब्यातून प्रवास करण्याची. तुम्हास मोकळीक आहे. तुम्हाला प्रवासच करावयाचा आहे आणि त्यासाठी निराळ्या डब्यात बसून जाण्याचे. स्वातंत्र्य तुम्हास दिले असता गोऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेल्या