१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 111

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ६९

डब्यावर तुम्ही हकक काय म्हणून सांगावा ? याला उत्तर एकच व ते हे की, हा प्रश्‍न नुसता प्रवासापुरता नसून समानतेचाही आहे. वरील कोटीक्रमास अस्पृश्यांचे उत्तरही त्याच अर्थाचे आहे. अस्पृश्य लोक देवळात शिरण्याचा जो आग्रह करीत आहेत ते केवळ साकाराचे प्रत्यक्ष पूजन करता यावे म्हणून नव्हे. अस्पृश्य लोकांना देवळात प्रवेश करून जी गोष्ट सिद्ध कंरून द्यावयाची आहे ती ही की, त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा देवळातील मूर्तीला स्पर्श केला असता तिचे पावित्र्य कमी होत नाही. ते सिद्ध करण्यास निराळ्या देवतेची स्थापना करून कार्यभाग होत नाही. तर ज्या देवाच्या ठायी पावित्र्य कल्पून स्पृश्य लोक ज्याची उपासना करितात त्यांच देवाची उपासना करण्याचा आग्रह अस्पृश्यांनी धरणे प्राप्त आहे. त्याशिवाय अस्पृश्यांचा हेतू तडीस जात नाही. फक्त पाप्यांच्या स्पर्शनिच देवाचे पावित्र्य ढळू शकते, आमच्या स्पर्शाने ते ढळणार नाही, कारण आम्ही पापी नाहीत, असे अस्पृश्यांचे म्हणणे आहे. यावरुन देवाच्या उपासकात कोणी पवित्र कोणी अपवित्र असा भेद नाही. हे त्यांच्या चळवळीचे तत्त्व आहे हे उघड होत आहे आणि म्हणूनच ते स्पृश्यांनी प्रस्थापित केलेल्या मूर्तीची उपासना करण्याचा आग्रह करीत आहेत. हा त्यांचा आग्रह सत्याग्रह नाही असे कोण म्हणेल? |

अस्पृश्यांच्या सत्याग्रहाविरुद्ध वर नमूद केलेले आक्षेप काढूनच हे स्वस्थ बसले नाहीत: त्यांनी काही व्यावहारिक आक्षेपही रचिले आहेत. या मुद्यावर त्यांचे म्हणणे असे आहे की, स्पृश्यांनी आपली मंदीरे अस्पृश्यांना खुली करून दिली पाहिजेत हे संघटनवाल्यांचे म्हणणे निराळे आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांना तुम्ही आपली मंदीरे आम्हास खुली करून द्या नाही तर सत्याग्रह करून त्यावर हक्क सांगंतो हे म्हणणे निराळे. कारण स्पृश्यास्पृश्यभेद हा अनंतकाळापासून चुकीने पडला असो अगर योग्य न्यायाने पडलेला असो, पण तो पडल्यावरच जर आम्ही स्पृश्यांनी देवस्थाने उभारली आणि चालविली तर त्यावर अस्पृश्यांनी हकक काय म्हणून सांगावा च तसा ते सांगू लागले तर ते न्याय्य होईल काय? अस्पृश्यांच्या सत्याग्रहाचा प्रश्‍न निव्वळ स्पृश्यास्पृश्य या विचाराचाच नाही तर न्यायान्यायाचाही आहे. खा बिचासँंसरणीवर या विरोधी लोकांची इतकी भिस्त आहे की, त्यांच्या मते अमरावती येथील अंबादेवीच्या पंचांनी अस्पृश्यांचा अर्ज केराच्या टोपलीत फेकला असला तरी वहिवाट व कायदा VT ALATA त्यांच्या बाजूला होता, कारण सर्वतोपरी समाजातील इतर सर्व बाबतीतील अस्पृश्यता गेली तरी एक जरी पंच वहिवाट नाही, असे म्हणणारा असला तरी कायद्याच्या जोरावर व न्यायाच्या हक्काने तो अस्पृश्यास मनाई करू शकेल. हा आक्षेप देखील अगदी नादानपणाचा आहे. स्पृश्यांनी देवळे बांधिली आणि चालविली ही गोष्ट