१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 114

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ७२

आपण आपल्या डोळ्यांच्या पापण्या हालबिल्या तर तेवढ्यानेच या जिवांचे

फळांच्या वगैरे सर्व ठिकाणी हातपाय तुटून पडतील. हवेत, पाण्यात,

जे. शेकडो. अत्यल्परूपजीव धरलेले आहेत त्यांची हत्या कशी de होणार?

डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी जे शास्त्रीय शोध लावले आहेत त्यावरून असे सिद्ध . होते की वनस्पतीला देखील जीव आहे. मग या वनस्पतीचा संहार करणारे

- ब्राह्मण तसेच नाकाला फडकी बांधून हिंडणारे जैन तीर्थकर यांनी अहिंसेचा टेंबा

मिरविण्यात काय हशील आहे? तसेच सर्वच ठिकाणी अहिंसेने कार्यभाग होईल

असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. समजा की, आपला जीव घेण्यास किंवा

` आपल्या पत्नीवर अगर आपल्या. कन्येवर बलात्कार करण्यास अथवा आपल्या

घरास आग लावण्यास, अगर आपली सर्व दौलत व स्थिरस्थावर हरण करण्यास

` एखादा दुष्ट मनुष्य हातात शस्त्र घेऊन सज्ज झाला व जवळ दुसरा कोणीही त्राता

नाही, तर आपण काय करावे? असल्या दुष्ट मनुष्याची आपण अहिंसा परमो धर्म: .. म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी किंवा तो सामोपचाराने ऐकत नसल्यास त्यास

.. यथाशक्ती शासन करावे? या दोहोंपैकी शेवटचाच मार्ग कोणीही झाला तरी तो

पत्करल्याशिवाय राहणार नाही व त्याचे करणे अशास्त्र आहे, असे कोणीही _ . म्हणणार नाही, कारण अशा वेळी हत्येचे पाप हत्त्या करणारास लागत नसून जो .. दुष्ट मरतो तो आपल्या अधर्मानेच मारिला जातो असे शास्त्रकर्ते म्हणतात, प्राचीन .. शासनकर्त्यांनीच नव्हे तर. अर्वाचिन फौजदारी कायद्यानेही आत्मसंरक्षमासाठी हिंसा करण्याचा हक्क्र काही मर्यादा ठेवून कबूल केला आहे. हिंसा करणे हे

'जरी अयोग्य असले. तथापि आत्मसंरक्षणाचे कार्य त्याशिवाय साधत नसल्यास

हिंसा करणे रास्त आहे असे समजतात.. भृणहत्त्या म्हणजे कोवळ्या पोराची ` हत्या अति गर्हा मानिली आहे. परंतु तेच पोर आडवे आले म्हणजे त्यास कापून .. काढावयास कोणी. हरकत घेत नाही. हाच तकवाद सत्याग्रहाच्या सिद्धिस लागू

करणे प्राप्त आहे व सत्याग्रही माणसास हिंसा करावी- लागली तर त्यास ती _ क्षम्य आहे असे कारणपरत्वे म्हणावे लागेल. गांधींचा अहिंसात्मक सत्याग्रहाचा

मार्ग अशा दृष्टीने पाहिले तर अव्यवहारिक ठरतोच.. पण तो अहिंसात्मक आहे

असे म्हणणे हा देखील निव्वळ भ्रम आहे. हिंसा म्हणजे हत्त्या करणे असा जर

हिंसेचा संकुचित अर्थ केला तरच हिंसा आणि अहिंसा यांच्यात काही भेद करता ` येईल.. परंतु हिंसा म्हणजे नुसता जीव घेणेच नव्हे तर दुसऱ्या प्राण्याचे मन . किवा शरीर यास इजा करणे याचाही त्यात समावेश होतो. अर्थात्‌, अहिंसा

म्हणजे कोणाही सचेतन प्राण्यास न दुखविणे होय. असा जर हिंसा या शब्दाचा

व्यापक अर्थ घेतला तर म. गांधींची अहिंसा ही एक प्रकारची हिंसाच आहे