डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ७६
अपमान करीत तोच “ज्या पुरुषाला अन्यायाचा राग येतो व॒ जो सहभ नाही
चीड येत तो आणि नपुंसक पुरुष म्हणावयाचा. ज्या पुरुषाला राग किंवा नाही
सारखेच'' परंतु आम्हाला आशा आहे की, अस्पृश्यता निवारण्याकरिता प्राण _ खर्ची घालण्याचा निश्चय जरी थोड्याच अस्पृश्यांचा झाला असला तरी अस्पृश्यता निवारणार्थ बंदीवास पत्करण्याचा निश्चय पुष्कळशा अस्पृश्यांचा झालाच आहे. आणि हे जर खरे असेल तर या कार्यात त्यांना यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सरकार अन्यायाने अस्पृश्यातील सत्याग्रहींना जरी तुरुंगात घालू लागले तरी ते किती दिवस घालील आणि किती जणांना घालील व स्पृश्य लोक तरी सरकारचा आधार किती दिवस घेतील! शेवटी शिकस्त झाली म्हणजे सरकारलाही या गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण सरकार जरी झाले तरी त्याला जनलज्जा ही आहेच. आणि ती काही काळपर्यंत सरकारास
वाटली नाही तरी ती वाटावयास लावणे हे देखील अस्पृश्यांच्याच हाती आहे. शांतताभंग होतो म्हणून सरकार आमचे न्याय्य हकक बजावण्याच्या आड जर येईल
तर आम्हास सुधारलेल्या राष्ट्राचे न्याय कोर्ट जो राष्ट्रसंघ त्याच्याकडे फिर्याद लावून सरकारास त्याच्या अन्यायीपणाबद्दल लाजविता येईल. तसेच ज्या स्पृश्य
लोकांच्या हेक्यासाठी, हक्कासाठी नव्हे, अस्पृश्यांना सरकार दंडन करणार त्या
स्पृश्य लोकांनाही याचा विचार करावा लागणार आहे. स्पृश्य लोकांना
अस्पृश्यांविषयी प्रेमाचा. पान्हा नसला तरी त्यांना आपल्या संरक्षणाची चिता आहे. आणि त्या चिंतेमुळे ते पोळत नसले तर त्यांना पोळावयास लावणे हे आमच्या हातात आहे व ते सत्याग्रहाच्या मार्गाने आम्हास सहन करता येण्या-
सारखे आहे. अस्पृश्यांचे सत्व पाहूच असा जर स्पृश्य लोकांनी निर्धारच केला
तर, फार तर सत्याग्रह अयशस्वी होईल. पण असे झाल्याने तोटा होणार तो कोणाचा? स्पृश्यांचा! सत्याग्रह करूनदेखील आपणास हिंदू धर्मात थारा देत नाहीत याची जाणीव पटल्यावर अस्पृश्य लोक जे आज ढकलून दिले तरी हिंदू धर्मातून जात नाहीत तेच हिंदू धर्म हा दगडांचा धर्म आहे, त्याच्यापुढे कपाळ फोडून घेतले तरी काही होणार नाही अशी खात्री होऊन, स्पृश्यांनो ! घ्या तुमचा धर्म | असे म्हणून आपोआप परधर्माल जाण्यास तयार होतील. इतक्या थराला ही गोष्ट स्पृश्य लोक जाऊ देतील असे संभवत नाही. मात्र आमचा सत्याग्रह आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे की, सरकारचे तुरुंग तुडुंब भरुन सत्याग्रही कैद्यास जागा नाहीशी झाली पाहिजे आणि स्पृश्य लोकांना हा पोरखेळ आहे असे न वाटता त्यांना धसका बसला पाहिजे.