७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तसेच काही काळही गेला पाहिजे. हे घडेतोपर्यत अस्पृश्य लोकांनी ज्या थोड्या थोडक्या प्रमाणावर त्यांना सत्याग्रह करता येईल त्या प्रमाणावर त्यांनी सत्याग्रह करण्यास सुरवात करावी हे बरे.
अस्पृश्यांनी सत्याग्रह करण्याच्या आड काही स्पृश्य लोक येत आहेत, हे आम्ही जाणून आहोत. या स्पृश्य लोकांपैकी काहींचा असा मुद्दा आहे की, अस्पृश्यांच्या समान हक्कांचा प्रश्न हा अस्पृश्यांनी सत्याग्रह करून सुटणार नाही. तो प्रश्न स्पृश्यांनी स्पृश्यातच चळवळ करून सोडविला पाहिजे आणि ज्या दिवशी देवस्थानावर, “ अस्पृश्यांनी देवदर्शनास Ard,” अशी फळी स्पृश्य लोक स्वखुषीने लावतील त्या दिवशी अस्पृश्यांनी खुशाल आत जावे. तोपर्यंत त्यांनी काही गडबड अगर धांदल करू नये! पण स्पृश्य लोक हा प्रश्न आपखुषीने सोडवितील काय ? आम्हाला त्यांची बिलकूल आशा नाही. कारण या लोकांचे असे म्हणणे आहे की, हा बहुमताचा, दयेचा, मायेचा, नीतीचा अगर समानहक्काचा प्रश्नच नाही. हा फक्त धर्मतत्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्य हे स्वधर्मरूपी विराट पुरुषाचा कोणताच भाग बनू शकत नाही. कारण ब्राह्मण मुख, क्षत्रिय बाहू, वैश्य मांड्या व शूद्र पाय बनल्यामुळे अस्पृश्यांना या विराट पुरुषाच्या आत स्थानच उरत नाही. अस्पृश्य लोक हे या हिंदू विराट पुरुषाच्या पायातली एक वहाण आहे. पादत्राण हा शरीराचा भाग कधीच होणे शक्य नाही तसेच अस्पृश्य हे कधीही हिंदुंशी एकजीव होऊ शकत नाही. तसे व्हावे म्हणणे मुर्खपणाचे व अविचाराचे आहे. अस्पृश्य वर्ग हा मुसलमान वर्गासारखा.असाच कक्षेबाहेरचा वर्ग आहे. स्वधर्मरूपी विराट पुरुषाचा पायापलीकडचा व देहाशी . प्रत्यक्ष संबंध नसलेला तो एक वेगळा भाग आहे. असे ज्या लोकांचे विचार आहेत त्या लोकांच्या दानतीवर व शीलावर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवून water बसावे हा उपदेश कपटी जरी नसला तरी मुर्खपणाचा आहे, हे खास.
दुसरे काही स्पृश्य लोक असे म्हणतात की, अस्पृश्य लोकांनी जर सत्याग्रह आरंभिला तर त्यांच्या हातून तो पार पडणे शक्य नाही. कारण सत्याग्रहाचे शस्त्र जर त्यांनी स्पृश्य समाजावर उगारले तर ज्या काही थोड्याबहुत स्पृश्य लोकांची अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला जी काही थोडीबहुत सहानुभूती आहे ती ते गमावून बसतील. कारण, हा आघात साऱ्या स्पृश्य समाजावर होणार असल्यामुळे सुधारक तसेच सनातनी स्पृश्य या आघाताचा प्रतिकार करण्यासाठी एकजीव झाल्याखेरीज राहणार नाहीत. पण या लोकांना आम्ही असे विचारितो की, स्पृश्य जनतेपैकी काही भांग आमच्यासोबत आहे हे आम्हास सांगावयास तुमची जरूरी नाही. आम्हाला ते कळतच आहे. तुम्हाला खरोखरीच जर