१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 121

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ७९

आमच्याबद्दल सहानुभूती असेल तर काही स्पृश्य लोक आमच्यासोबत आहेत अशी सबब सांगून सत्याग्रहापासून आम्हास परावृत्त करु नका. तुम्ही जर खरोखरीच आमच्या AH आहात, आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल तुम्हाला राग किंवा चीड आली असेल तर तुम्ही आमच्या सत्याग्रहात सामील व्हा, यातच तुमच्या सहानुभूतीची खरी पारख आहे. नाही तर तुमची मैत्री असली काय आणि द्वेष असला काय आम्हाला सारखेच.

अमर्षशून्येन जनस्य जन्तुना न जातहार्देन न विद्विषादराः !!

अमेरिकेत जेव्हा गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी मोहीम सुरवात करण्यात आली तेव्हा अमेरीकेतील गोऱ्या लोकात दोन पक्ष होते. दक्षिणेतील गोरे लोक या मोहिमेच्या विरूद्ध होते व उत्तरेकडील गोरे लोक या मोहिमेच्या तर्फे होते. तथापि उत्तरेकडील प्रांतांतील गोऱ्या लोकांनी दक्षिणेतील काही गोरे लोक तुमच्याविरूद्ध आहेत सबब तुम्ही गुलामगिरीविरूद्ध चळवळ करू नका असा काही ब्राह्मणी उपदेश त्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या काळ्या RA लोकांना केला नाही. उलट काळ्या Rel लोकांशी संगनमत करून व त्यांच्याशी सहकार्य करून त्यांच्या स्वातंत्र्याला त्यांनी विरोध करणाऱ्या आपल्या जातभाईंना त्यांनी स्वर्गाची वाट दाखविली व कोणत्याही प्रकारचा अंगचोरपणा दाखविला नाही. त्याचप्रमाणे स्पृश्य वर्गातील जे लोक तुमची मागणी रास्त आहे अशी सहानुभूतीची कबूली दाखवितात त्यांना Re) लोकांच्या गोऱ्या सहानुभूतीवाल्यांनी जे करून दाखविले तसेच वर्तन तुम्ही करून दाखवाल तरच आम्ही लुमच्यावर विश्वास ठेवू असे अगदी रोखठोकपणे बजाविले पाहिजे. नाही तर हे लोक सहानुभूतीची साखर पेरून जो अन्याय एकही दिवस सहन [करणे ] पाप आहे तोच अन्याय तसाच पुढे आपणास स्वसंतोषाने सहन करावयाची [भूरळ ] पाडतील.

तिसऱ्या प्रतीचे स्पृश्य लोक म्हणतात की, स्पृश्य व अस्पृश्य हे एकाच समाजाचे

घटक आहेत. सत्याग्रह करावयाचा तो स्वकियांशी करावयाचा नसतो. तो

परकियांशी करावयाचा असतो. तसे जरी नसले तरी हिंदू समाजावर बाहेरून हल्ले होत असताना अस्पृश्यांनी त्यांचे निवारणास मदत करण्याऐवजी आपापसात यादवी माजवावी हे रास्त नाही. उपदेश मोठा गोड आहे ! पण तो अस्पृश्यांनी काय म्हणून ऐकावा ? ज्या धर्मात त्यांना मुळी स्थानच नाही, ज्यात त्यांना पायातली वहाण म्हणून वागविले जाते त्या धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी काय म्हणून मरावे ? ही जबाबदारी स्पृश्य लोकांची आहे. कारण हिंदू धर्माचे हक्क