१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 122

८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ही त्यांची मिरास आहे. खानेकू हम और लढनेकू तुम असा हा उपदेश वेडसरपणाचा आहे व तो ऐकण्याइतके अस्पृश्य लोक मुर्ख नाहीत. आजवर हिंदू धर्माचे रक्षण केले हीच मोठी चूक झाली असे त्यांना वाटू लागले आहे. अशी वृत्ती धारण करणाऱ्या अस्पृश्य लोकास वरील प्रकारचा उपदेश करण्याचा अधिकार स्पृश्य लोकास आहे असे आम्हास वाटत नाही. विरोधी पक्षाच्या नडीचा फायदा घेऊन आपली सवड साधून घेणे हे व्यवहार संमत आहे. तेच धोरण अस्पृश्य लोकांनी आपले सामाजिक हकक मिळविण्याकरिता स्पृश्य लोकांशी ठेवले आहे. हे नीतीच्या दृष्टीने वाजवी नसेल. पण राजकीय हक्क मिळविण्याकरिता '" साम्राजाच्या गरजा येती कामाच्या काजा “ अशी घोषणा करून भर लढाईच्या प्रसंगात सरकारला अडवावयास मागे पुढे न पाहाणाऱ्या स्पृश्य लोकास नावे ठेवण्याचा अधिकार कसा पोहोचतो हेच आम्हास कळत नाही. आता आपापसात यादवी करू नये असे जे म्हणतात त्यांना आम्ही असे सुचवितो की, तुमची गीता काय सांगते ते पहा. गीतेत भगवंताने अर्जुनास जो उपदेश केला आहे त्यांपेक्षा आम्ही निराळे असे काय सांगितले आहे. कौरव-पांडवांची सैन्ये लढाईस सज्ज होऊन कुरुक्षेत्रावर उभी असताना लढाईस तोंड लागण्यापूर्वी अर्जुनानी मध्यभागी आपला रथ नेऊन दोन्ही सैन्याकडे दृष्टी फेकिली व पाहिले तो आपलेच स्नेही, आप्त, गुरु त्यास कौरवांच्या सैन्यात दिसले. तेव्हा हा लढाईचा प्रसंग कोणत्या स्वरुपाचा आहे हे त्याच्या डोळ्यांपुढे आले व तो युद्ध करण्याचे नाकारून व आपल्या हातचे धनुष्य बाण ठेवून खाली बसला. कौरव व पांडव हे आप्त आहेत ही गोष्ट श्रीकृष्णाला ठाऊक नव्हती असे नाही. कौरव जरी पांडवांचे हक्क देण्यास तयार नव्हते तरी भीष्म, द्रोण, विदूर, वगैरे शिष्ठ लोक त्यास अनुकूल होते व काही कालाने त्यांच्या मताँचा परिणाम कौरवावर झाला असता ही गोष्ट श्रीकृष्णाला अवगत होती. आपापसात यादवी करू नये हे तत्व जर सत्य असते तर अर्जुनाचे वर्तन पाहून खरोखर तू म्हणतोस तेच खरे. तुला झालेली उपरति Wet मला आनंद वाटतो असे कृष्ण परमात्मा का म्हणाला नाही ? " SoHE, अरे ही अवदसा तुला कोठून आठवली. हा हिजडेपणा तुला शोभत नाही, हे दुबळेपण सोडून युद्धाला उभा रहा“ असे त्याने अर्जुनास सांगितले. इतकेच नव्हे, तर या युद्धात असंख्य लोकांची प्राणहानी होणार आहे हे धडधडीत दिसत असताना त्याला या गोष्टीची कवडीची देखील दिक्कत वाटली नाही आणि हे सारे कशाकरिता तर कौरवांनी हिरावून घेतलेले पांडवाचे राज्य परत मिळविण्याकरिता ! ज्या वस्तुसाठी अर्जुन सत्याग्रह करीत होता त्या वस्तूला, ज्या वस्तूसाठी अस्पृश्य लोक सत्याग्रह करणार आहेत त्या