१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 123

अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ८१

वस्तूच्या मानाने फुटक्या कवडीचीही किंमत नाही. पांडव राज्यासाठी भांडत होते, अस्पृश्य लोक माणुसकीसाठी भांडत आहेत. माणुसकी गेल्याने माणसाचे सर्वच काही जाते. परंतु राज्य गेल्याने माणुसकी तरी शिल्लक राहते. राज्यावाचून पांडव काही मेले नसते. पण माणुसकीवाचून अस्पृश्य लोक जिवंतपणी मेले आहेत. राज्यासारख्या क्षुल्लक ध्येयासाठी जर पितृहत्त्या, गुरुहत्त्या, बंधुहत्त्या किंवा कूलक्षय या सारखी घोर कर्मे करावयास अर्जुनास श्रीकृष्ण सांगतो तर माणुसकी कमविण्यासारख्या अत्युत्तम ध्येयासाठी साधा

Bea देखील अस्पृश्यांनी करू नये असे स्पृश्यानी सांगणे हा निव्वळ बाष्कळपणा

होय. |

खरे म्हटले असताना या स्पृश्य लोकांचे ऐकण्याचे आम्हास काही प्रयोजन नाही; कारण ते आमचे कितीही जरी हितचिंतक असले तरी ते आम्हास या बाबतीत उपदेश करण्यास अपात्र आहेत. कारण हा प्रश्‍न अधिकाराचा, जातीचा, स्वार्थाचा व मनोधर्माचा आहे. विद्येचा, ज्ञानाचा अगर बुद्धिचा नव्हे. यास्तव त्यांचा हा आपमतलबी उपदेश आपण न ऐकता त्यास स्पष्टपणे आपण बजाविले पाहिजे की, तुम्ही आम्हास उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नका.

कसलाही लढा पडला तर प्रथम त्यात शिष्टाई होत असते व शिष्टाईचा उपयोग नच झाला तर मग युद्ध करण्याची पाळी येते. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात पुप्कळ काळपर्यंत शिष्टाई झाली आहे असे आम्हास वाटते. जेव्हापासून ही अस्पृश्यता हिंदुधर्मात शिरली तेव्हापासून तिच्याविरुद्ध अनेक महात्म्यांनी प्रयत्न केले. परंतु या बाबतीत स्पृश्य लोकांचा दुराग्रह इतका भयंकर आहे की अपरिहार्य प्रसंग सोडून दिले तर त्यांनी याबाबतीत सूईच्या अग्रावरही जितकी माती राहते तितकी सुद्धा माती पांडवांना न देणाऱ्या पाषाणहृदयी व अधर्मप्रेमी दुर्योधनापेक्षा विशेष औदार्य दाखविले आहे असे कोणालाही वाटणार नाही, आणि यापुढे त्यांच्या वृत्तीत आत्मप्रेरणेने अस्पृश्यांस अनुकूल असा काही तरी फरक होईल असेही दिसत नाही. वास्तविक पाहिले असता ह्या अन्यायाला आम्ही मान दिली म्हणूनच तो आज इतके दिवस चालू राहिला आहे. तो झुगारून देण्याचा जर आम्ही मनापासून निश्चय केला तर तो कोणीही आमच्यावर लादू शकणार नाही. ज्या ब्राह्मणी धर्माने आपल्याला हीन करून टाकीले, त्याच ब्राह्मणी धर्माने कायस्थासारख्या जातीवरही हीनत्वाचा शिक्का मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यातील लोकांनी वेळेवर प्रयत्न केल्यामुळे त्यांचा दर्जा त्यांना कायम ठेविता आला. कालाचे चक्र उलट फिरत असताही आमच्या पूर्वजांनी गाढ झोप घेतली. इतरांप्रमाणे आमच्या लोकांनीही डोळे उघडे ठेऊन होत