१३-११-१९२७ स्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी - Page 124

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ८२

आज अस्पृश्य हा केवळ असलेल्या अन्यायाचा प्रतिकार वेळीच केला असता तर

इतिहासातला शब्द म्हणून राहिला असता. तसे करण्याचा निश्चय मागील पिढीने केला नाही ही अत्यंत लांछनाची गोष्ट आहे. परंतु मागील पिढीत ज्ञानाचा प्रसार नसल्या कारणाने त्यांच्या बेफिकीरी वर्तनास क्षम्य म्हणता येईल परंतु या पिढीची गोष्ट निराळी आहे. अस्पृश्यांना कदापि न प्राप्त झालेले ज्ञान या पिढीला लाभलेले आहे. आणि म्हणून मागील पिढीचे हातून जी गोष्ट घडली नाही, ती गोष्ट घडवून आणणे हे ह्या पिढीचे कर्तव्यकर्म आहे. त्यास जर या पिढीतील लोक जागणार नाहीत तर ते कुलवंत नसून, कुलांगार आहेत असेच

म्हणावे लागेल.

अध्यक्षांचे भाषण झाल्यावर विषय नियामक कमेटीची निवडणूक करण्यात येऊन सभेचे काम दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

परिषदेत खालील सद्गृहस्थ प्रामुख्याने दिसत होते. खुद्द अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख, बॅरिस्टर तिडके, श्री. चौबळ वकील, श्री. गवई

एम. एल. सी., श्री. के. बी. देशमुख, डॉ. भोजरांजा, डॉ. पटवर्धन, श्री. उत्तमराव कदम इत्यादि गृहस्थ असून परिषदेकरिता बाहेरून मुद्दाम आलेले

श्री. नानासाहेब अमृतकर, मोर्शी, श्री. दे. वि. नाईक, सं. ब्राह्मण ब्राह्मणेतर,

श्री. दत्तात्रय विठ्ठल प्रधान, दादर, श्री. रा. दा. कवळी, श्री. द. रा. रारावीकर हे हजर होते.

त्याच दिवशी रात्री विषय नियामक कमेटीची बैठक होऊन दुसऱ्या दिवशी

परिषदेपुढे येणाऱ्या ठरावाची चर्चा झाली.

ता. १४ नोव्हेंबर १९२७ सकाळीच ७ वाजता अमरावती येथील अस्पृश्य विद्यार्थी वर्गाकडून डॉ. आंबेडकर ह्यांना मानपत्र व पानसुपारीचा समारंभ करण्यात येऊन डॉ. आंबेडकर व इतर पाहुणे मंडळीसह सर्व विद्यार्थीवर्गाचा एक फोटो घेण्यात आला. मुलांच्या मानपत्रास उत्तर देताना डॉ. साहेबांनी मुलांनी आपले शील कसे बनवावे ह्याचा अगदी थोडक्यात उपदेश करून, ह्या मुलांनी आपल्या कुळाला लागलेला AVIVA" चा डाग धुवून काढण्यास कशी मदत करावी हे विषद करून सांगितले. नंतर सर्व मंडळी परिषदेस बरोबर ८ वाजता हजर झाल्यावर परिषदेस सुरवात झाली. सुरूवातीलाच मुंबईहून श्री. बाळाराम आंबेडकर ह्यांच्या निधनाची बातमी तारेने येऊन धडकली.