८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
t
दुपारी महाराष्ट्र केसरीचे संपादक श्री. चव्हाण व श्री. के. बी. देशमुख ह्यांच्या- येथे डॉ. आंबेडकर व पाहुणे मंडळीस *' टी पार्टी “ देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमरावतीच्या परिषदेत असताना त्यांना त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम यांचे रविवार दिनांक १२ नोव्हेंबर १९२७ रोजी दुपारी १२ वाजता एकाएकी हृदयक्रिया बंद पडून निधन झाल्याचे कळले. त्यामुळे ते अंत्ययात्रेस हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत जे अस्पृश्य बंधू प्रेत यात्रेस हजर होते त्यांच्याप्रती क्रणनिर्देश करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'बहिष्कृत भारत' दिनांक २५ नोव्हेंबर १९२७ च्या अंकात म्हणतात, |
''माझ्या वडील बंधूच्या मरण समयी मी मुंबईत नव्हतो. अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी जी अमरावती येथे ता. १३ नोव्हेंबर रोजी माझ्या अध्यक्षतेखाली परिषद भरण्याचे ठरले होते त्या परिषदेला मी गेलो होतो. माझ्या गैरहजेरीत ज्या तीन चार हजार अस्पृश्य बंधुंनी प्रेतयात्रेस हजर राहून असल्या दुःखप्रसंगी आपली सहानुभूती दर्शविली त्या सर्वांचा मी अत्यंत क्रणी आहे.” -भीमराव आंबेडकर.