अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ८७
अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम मंदिराच्या पटांगणात स्पृश्यांची एक जाहीर सभा गेल्या आक्टोबर महिन्यात भरली होती. तीत अस्पृश्य वर्गातील लोकास असे बजाविण्यात आले की, तुम्ही दरिद्री व परोपजीवी असल्याकारणाने स्पृश्य हिंदुंची मने दुखवून व धमक्या देऊन तुम्ही हा प्रश्न नेटास लावल्यास तुम्हाला मिळत असलेला आश्रय बंद करून स्पृश्य लोक उपासमारीने तुम्हास वठणीवर आणतील!
संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस मोठी कारणींभूत अशी वस्तू आहे. या दृष्टीने तिचा संग्रह करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु संपत्तीचा उपयोग गरीब प्रजेस जखडून ठेवण्याकडे किंवा तिची वाढ खुंटविण्याकडे आणि आपली प्रौढी व वर्चस्व माजविण्याकडे जेव्हा संपत्तीवान लोक करतात तेव्हा त्यांच्या संपत्तीला शास्त्रकारांनी आसुरी संपत्ती असे म्हटले आहे व तिचा धिक्कार केला आहे. ही धर्मशास्त्राची शिकवण जे आम्हास उपदेश करीत आहेत त्यांनाही मान्य आहे. तसे जर नसते तर मुंबईसारख्या शहरात जेव्हा मालक आणि मजूर यांच्यातील भांडणे विकोपास जातात तेव्हा हे शिष्ट लोक, मालक तुमच्यावर बहिष्कार टाकतील, सांभाळा! तुमच्या उपजीविकेची साधने त्यांच्या हाती आहेत अस! उपदेश संप करण्यास सिद्ध झालेल्या मजूर लोकास करते. पण हे लोक मजूर लोकास हा झगडा करण्यास नुसते उत्तेजन देतात इतकेच नव्हे तर मालक लोकास तुम्ही संपत्तीच्या जोरावर न्यायासाठी झगडणाऱ्या गोरगरीबांना दडपण्याचे आसूरी कृत्य करू नका, असा उपदेश करतात. याबद्दल आम्हास काही वाईट वाटत नाही उलट, आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. पण त्यांना आम्हास एक - f
प्रश्न विचारावासा वाटतो व तो हा की, आर्थिक स्वातंत्र्यासाठी झगडा करणाऱ्या लोकांविरुद्ध संपत्तीचा दुरुपयोग करणे हा जर अधर्म आहे तर सामाजिक समता प्राप्त करून घेण्यासाठी झगडा करणाऱ्या अस्पृश्य लोकांविरुद्ध संपत्तीचा दुरुपयोग करणे हा धर्म आहे काय? वतो जर अधर्म आहे, तर मगज्या तुम्ही लोकांनी सत्याग्रहाच्या बाबतीत उपदेश करण्याचा योग ओढून घेतला आहे त्यांनी आमच्या प्रतिपक्षास आमच्यावर संपत्तीच्या जोरावर बहिष्कार टाकणे व आमची : गति खुंटविणे हे पाप आहे, असे का सांगितले नाही? तसे जर त्यांनी केले असते : तर त्यांच्या मनाच्या निर्मळतेची कसोटी आम्हास पटली असती. तसे न केल्यामुळे त्यांचा उपदेश केवळ अस्पृश्यांना सावध करण्याकरिता केला आहे यावर आमचा विशवास बसत नाही. त्यात चिथावणीचे जहर भरले आहे, असे आम्ही मानतो. कारण जसे उघडपणे निषेध करण्याची शरम वाटली म्हणजे काही लोक कधी कधी उपदेशाच्या मिषाने निषेध करण्याची आपली मनीषा [तृप्त ] [करून ]
- घेतात तशापैकी तर हा प्रकार आहेच, पण हा [उपक्रम, ] [साधा ] [उपदेश ] [अगर ]