अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ९१
महापुरुषांचे पाद वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, असे युधिष्ठिरास वाटले व रणांगणावर आपले कवच काढून ठेवून नम्रपणाने तो त्याजकडे जाता झाला. शिष्टसांप्रदायाचे योग्य अनुकरण करणाऱ्या युधिष्ठिराला आशीर्वाद देणे त्यांना क्रमप्राप्त होतेच. परंतु आशीर्वाद देताना आपल्या स्थितीची आठवण झाली आणि आमची बाजू सत्य आहे व कौरवांची बाजू असत्य आहे हे तुम्ही मान्य करीत असूनही सत्याच्या बाजूने का लढत नाही असा प्रश्न युधिष्ठिर कदाचित _ आपणाला विचारील याची जाणीव होऊन ते आपल्या मनात ओशाळले व तो विचारण्यापूर्वीच त्यांनी युधिष्ठिरास सांगितले की,
अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित्।
इति सत्य महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः॥
*“ मनुष्य अर्थाचा गुलाम आहे; अर्थ कोणाचा गुलाम नाही. असा खरा प्रकार असल्यामुळे, हे महाराज युधिष्ठिरा! कौरवांनी आम्हाला अर्थाने बांधून टाकिले आहे.'* असे म्हणण्याचा प्रसंग अस्पृश्य लोकावर का येणार नाही याचे दिग्दर्शन वरती केलेच आहे. तथांपि, आलाच तर त्यांची धारणपोषणशक्ती कशी तग धरील व ते स्वावलंबी कसे होतील याचा विचार करणे इष्ट आहे, व म्हणून त्या विषयावर आमचे विचार प्रगट करण्याचे आम्ही आज योजिले आहे.
प्रथमतः अस्पृश्य वर्गात ज्या अनेक जातींचा समावेश झाला आहे त्या जातींपैकी कोणकोणत्या जांतीस या बहिष्काराचा विशेष जाच होणार आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. चांभार व ढोर या दोन धंदेवाईक जाती आहेत. अर्थात त्यांच्यावर बहिष्काराची मात्रा लागू होणे शक्य नाही. उलट त्यांनीच जर स्पृश्य लोकांवर बहिष्कार टाकला, नवीन जोडे बांधावयाचे किंवा जुने जोडे सांधावयाचे बंद केले तर त्यांचे चालण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे मांग लोकही धंदेवाईक लोक आहेत. त्यांनी दोऱ्या, दोरखंडे, अगर केरसुण्या करावयाचे बंद केले, तर त्यांच्यानेही स्पृश्य लोक अडले जाणार आहेत. कारण बैलाला कासरा आणि मोटेला नाडा ही शेतकऱ्यांच्या आयुधांपेकी महत्त्वाची आयुधे आहेत व ती मांग लोकांच्या हाती असल्यामुळे स्पृश्य लोकांना त्यांच्यावर बहिष्कार टाकणे हितावह होणार नाही, उलट त्यांनीच जर बहिष्कार टाकला तर [स्पृश्य ] [लोकांना ] [त्यांच्यापुढे ] नमावे लागेल. भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात FA शकतील. त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला असला तरी [त्या ] [धंद्याची ] [उपयुक्तता ] [इतकी ]