अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ९३
मामलेदार त्यास दुजोरा देऊन प्रांताकडे पाठवितो आणि प्रांत हुकूम करतो की महारांना 'सस्पेंड' करा. अशापरी केवळ वरचे अधिकारी स्पृश्य जातीचे असून खोट्या धर्माभिमानाला बळी पडले असल्यामुळे वतनाची गदा महारांवर बसते व यामुळे महारांना स्पृश्याधीन होऊन राहिल्याशिवाय गत्यंतर उरत नांही. वतनामुळे महार लोकांस जसे स्पृश्याधीन होणे भाग पडते तसेच त्यांना वतनामुळे स्पृश्यावलंबी व्हावे लागते. महार हे वतनदार कामगार या नात्याने सरकारचे नोकर आहेत परंतु या नोकरीबद्दल मिळावयाचा पगार त्यांना सरकारकडून मिळत नाही. त्यांचा पगार म्हणजे बलुते व ते त्यांना देणार ती स्पृश्य जनता! अशी ही वतनाचौ व्यवस्था असल्याकारणाने महार जाल ही सहजासहजी स्पृश्यावलंबी झाली आहे. काम जरी सरकारचे करणे झाले तरी त्या कामाबद्दल पगार द्यावयाचा किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार रयतेकडे आला आहे व ती रयतही खोट्या धर्माभिमानाला बळी पडली असल्यामुळे महार लोक पायरीने वागतात किंवा नाही याची खबरदारी घेतल्याशिवाय बलुते अदा करीत नाही. एकूण अधिकाऱ्यांच्या व रयतेच्या कैचीत सापडलेल्या महार प्रजेला या वतनव्यवस्थेमुळे स्पृश्यांची गुलामगिरी पत्करावी लागत आहे. ह्या गुलामगिरीतून जर महार लोकांना आपली सुटका करून घ्यावयाची असेल तर त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळविले पाहिजे व म्हणूनच आम्ही सांगतो की प्रथम महार वतनव्यवस्थेत सुधारणा करा. त्यातील पहिली सुधारणा ही की इनाम जमिनीवर कर आकार देऊन जर जमीनी त्यांना ठेवता आल्या तर त्यांनी वतनी नोकरी अजिबात सोडून द्यावी. म्हणजे एका दमात स्पृश्याधीनं व स्पृश्यावलंबी झालेली महार प्रजा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईल. . एवढे जरी करता आले नाही तरी त्यांनी रयतेकडून बलुते घेण्याऐवजी सरकारकडून पगार मागावा. ` याने ती स्पृश्याधीन राहिली तरी ती निदान स्पृश्यावलंबी राहणार नाही. ही सुघारणा घडून आल्यास बहिष्काराचा जाच आपणास होईल अशी चिंता करण्याचे काही विशेष कारण महार लोकास उरणार नाही
वतन सोडून तुम्ही स्वतंत्र व्हा असे महार लोकास सांगितले असता वतन सोडले तर आम्हास दुसरा उपजीविकेचा मार्ग कोणता, असा ते लोक उलट प्रश्न करीत असतात. खरे म्हटले असता हा, प्रश्न महार लोकांनी करावयाचे काही कारण नाही. जो माणूस जन्माला येतो तो काही आपल्यासाठी एकादा पोट भरण्याचा. धंदा बरोबर घेऊन येत नाही. जन्मास आल्यानंतर त्याच्या लायकीप्रमाणे तो कोणता ना कोणता उद्योग करून आपले पोट भरतोच. मग महारांनाच का भरता