२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 136

९४ डॉ. वाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भापणे

येणार नाही? तथापि, आर्थिक स्वातंत्र्याचे उपाय म्हणून आम्ही त्यांना एक दोन सूचना करीत आहोत. आमची महार लोकांना पहिली सूचना अशी आहे की तुम्ही आपल्या निराळ्या वसाहती करा. महार लोकांना गावाचा मोठा अभिमान आहे. वडिलांचा गाव सोडून जाणे याचे त्यांना मोठे कोडे पडते. वडील मेले तेथेच मरणे हे आपले कर्तव्य आहे असे ते समजतात. गावात महारांना जर मानापानाने लोक वागवते तर गावाबद्दल अभिमान बाळगणे रास्त होते. पण जेथे गावातले लोक महारांना कसपटासमान लेखतात, लहान सहान कारणावरून त्यांचा गाव बंद करतात, ज्या गावात शिवीशिवाय कोणी बोलत नाही, त्या Ware राहण्याचा आग्रह महारांनी धरावा ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या जुलूमाची कहाणी महार लोकांस कोणी सांगावयास नको. सोलापूर जिल्ह्यात मासणूर, रातंजन, राळेरास, पानगाव, सुरडी, मालवंडी, चिखरडे, कासेगाव, शिरबाबी वगैरे गावात महार लोकांवर गावकऱ्यांचा कसा जुलूम चालला आहे हे बहिष्कृत भारताच्या वाचकास श्रुत आहेच. या गावापैकी कित्येक गावांनी महारांना हाकून द्यावयाचा निश्चय केला आहे व तो ते शेवटास नेण्याच्या विचारात आहेत. या परिस्थितीस dis देणे महार लोकांना-कठीण पडते. कारण दोन अडीचशे उंबऱ्यांच्या गावात महारांची काय ती दहा-पाच घरे असतात. अशा चिमुकल्या लोकास बहुसंख्यांक जातीतील गुंड लोकांच्या अत्याचारास पुरे पडणे शक्य नाही. तेव्हा दरेक गावात पाच-पाच, दहा-दहा घरांची तुरळक वस्ती ठेवून कोंडमारा करून घेण्याऐवजी निरनिराळ्या गावातील लहान लहान वस्ती उठवून त्यांची एक निराळी वसाहत केली तर ही व्यवस्था त्यांच्या सर्वस्वी हिताची होणार आहे. अशा प्रकारच्या वसाहती जेथे जेथे फॉरेस्ट जमीनी आहेत तेथे जर करण्यात आल्या तर वतन गेल्यामुळे होणारे नुकसान शेंती करून महारांना हजारो पटीने भरून काढता येईल व तेही कोणाची गुलामगिरी न करता स्वतंत्रपणे करता येईल. अशा वसाहतीपासून नुसती उपजीविकांच होईल इतकेच नव्हे तर त्यापासून दुसरे पुष्कळसे फायदे होण्यासारखे आहेत. गावात राहिल्याने महारांना कोणताच व्यवसाय करता येत नाही. परंतु तेच महार लोकांनी निराळी वस्ती केली तर त्यांना सर्व प्रकारचे मार्ग मोकळे होतील. महार पाटील होऊ शकेल, महाराला किराणा मालाचे दुकान घालता येईल. महाराला Arad दुकान घालता येईल. जो उद्योग आज महारांना गावात राहून करता येत नाही तोच उद्योग निराळी वस्ती केल्यावर महारांना करावयास सापडेल. निराळी वस्ती