२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 138

९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्यांना आता कदाचित असे वाटेल की, आम्ही विणलेली खादी घेणार कोण? व ती जर कोणी घेतली नाही, तर खादी विणल्याचा उपयोग काय? परंतु हा प्रश्‍न सोडविणे काही बिकट नाही. महार लोकांना स्वतःचे उपयोगासाठी कपडा विकत घ्यावा लागतोच. तेव्हा सर्व महार लोकांनी जर खादीचे कपडे वापरण्याचा निश्चय केला आणि महारांनी विणलेल्या खादीशिवाय दुसऱ्या कोणाची खादी घ्यावयाची नाही अशी जरी शपथ घेतली तरी विणकर महारांना स्वजातीची इतकी मोठी गिन्हाईकी होईल की ते त्यांना पुरून उरेल. या दोन गोष्टी अंमलात आणण्यास द्रव्याचे साहाय्य लागेल. परंतु ते साहाय्य मिळण्यास फारसे प्रयास पडणार नाहीत. महार लोकांचा निश्चय झाला म्हणजे बस्स आहे.

महारांना जर आपली माणुसकी मिळवावयाची असली तर त्यांनी रयतेच्या गुलामगिरीतून मुक्‍त झाले पाहिजे आणि जर त्यांना मुक्‍त व्हावयाचे असेल तर त्यांना वरील गोष्टी एकनिश्चयाने करावयास पाहिजेत. त्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे

पहिल्या दिवसाचे काम आटोपले. नंतर त्याच मंडपात त्याच वेळी महार वतनाचे दुरुस्तीचे जे बिल डॉ. आंबेडकर साहेबांनी मुंबई कौन्सिलमध्ये आणले आहे त्याला पाठिंबा देण्याकरिता शेट माणेकचंद शहा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी सभा सुरू झाली. त्या सभेत पुढे लिहिलेला ठराव मांडण्यात आला

डॉ. आंबेडकर साहेब यांनी महार वतनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जे बिल आणिले आहे, त्या बिलास ही वतनदार महार परिषद आपला पूर्ण पाठिंबा देते.''

हा ठराव श्री. हरीभाऊ तोरणे यांनी मांडला. त्यास गो. गो. कांबळे यांनी अनुमोदन व भिमा तात्या वेसकर आणि निवृत्ती बंदसोडे यांनी पुष्टी दिल्यावर शेट | माणेकचंद यांनी महार वतनाच्या बिलाचे स्पष्टीकरण करण्याकरिता डॉ. आंबेडकर साहेबांना विनंती केली. त्यांनी लोकांना आपण आणलेल्या दुरुस्तीचे बिल अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. लोकांना ते तात्काळ पटले. सर्व लोक सभेत म्हणू लागले की, डॉ आंबेडकर साहेब यांनी आता समजावून सांगितल्याप्रमाणे जर बिलात सुधारणा झाली तर आम्हा वतनरुपी रौरव नरकात पडलेल्या किड्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणून सर्व लोकांनी डॉ. आंबेडकर यांचा जयजयकार केला व म्हणू लागले की जे लोक महार वतनावर गदा म्हणून महार लोकांची दिशाभूल करीत आहेत ते महामूर्ख किंवा पाजी तरी असले पाहिजेत. सभेचे अध्यक्ष माणेकचंद यांनी देखील बिलाच्या पुष्ट्यर्थ भाषण केले व लोकांना या ठरावाच्या विरुद्व किवा काही प्रश्‍न विचारावयाचे असतील ते खुशाल विचारा असे सांगितले. पण कोणीही प्रश्‍न विचारिले नाहीत. नंतर ठराव मताला टाकता तो प्रचंड टाळ्यांच्या गजरात पास झाला. नंतर सभेचे काम दुसऱया दिवसापर्यंत तहकूब ठेवण्यात आले. |