२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 139

अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ९७

ता. २७-१२-२७ .रोजी सकाळी विषयनियामक कमिटीची बैठक भरविण्यात आली. सदर बैठकीत खाली लिहिलेले ठराव परिषदेपुढे मांडण्याकरिता सर्वानुमते ठरविण्यात आले. परिषदेच्या कामास रविवारी ११.३० वाजता डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली.

परिषदेत खालील ठराव पास झाले

(१) गीतेत सांगितलेल्या गुणकर्म विभागशः तत्त्वांची पायमल्ली करून जन्मजाति विभागशः या तत्त्वावर समाजाची रचना करण्यात आल्यामुळे हिंदू समाजाचा सर्वस्वी घात झाला आहे असे या परिषदेचे ठाम मत आहे. यास्तव ही परिषद हिंदू धर्माधिकारी वर्गास असे सुचविते की, त्यांनी प्रचलित चातुर्वर्ण्याची कल्पना सोडून हिंदू समाजाचा एक वर्ण होईल अशा प्रकारची पुनर्घटना करण्याचे कार्य त्वरित हाती घ्यावे. या बाबतीत दिरंगाई अगर कसूर झाल्यास चातुर्वण्याच्या चौकटीत सापडून चिरडून गेलेल्या अस्पृश्यवर्गास आपली सुटका करून घेण्यास धर्मातर करावे की काय, याचा विचार करावा लागेल.

(२) या परिषदेचे असे मत आहे की, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठोबाचे देवालयात प्रवेश होईल अशी व्यवस्था अस्पृश्य वर्गानी करावी व प्रसंग पडल्यास येथे सत्याग्रहही करण्यात यावा |

(३) ही परिषद असे ठरविते की, वतनदार महारांच्या गान्हाण्याची दाद लावून घेण्याची कायमची व्यवस्था करण्याकरिता दरेक जिल्ह्यास एक महार वतनदार संघ स्थापन करण्यात यावा. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याकरिता एक संघ स्थापन करण्यास व गावागणिक वार्षिक वर्गणी रु. ५ घेण्यास आपली मंजुरी देत आहे व संघाचे चालकत्व खालील गृहस्थांकडे सोपवीत आहे.

सोलापूर तालुका--विशवनाथ मेघाजी बंदसोड़े

पंढरपूर तालुका--बापू ऐलूनी सर्वगोड

करमाळे तालुका--गोविद गोपाळ कांबळे

माळशिरस तालुका--तात्याबा पांडुरंग सावंत

सांगोले तालुका--चोखा शिदू काटे

मांढे तालुका--पिराजी मरीबा सरवदे

बार्शी तालुका--सखाराम महादू बोकेफोडे

सोलापूर शहर--जिवाप्पा सुभानराव ऐदाळे

` सेक्रेटरी--हरिमाऊ तोरणे