२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 140

९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

वरील नेमलेल्या लोकांस या संघाचे नियम तयार करण्याचा अधिकार ही सभा देत आहे आणि त्यांनी केलेले नियम पुढील वतनदार जिल्हा सभेत मंजूर करुन घ्यावेत व ती सभा निदान दोन-वर्षाच्या आत भरविण्यात यावी.

(४) सोलापूर, पंढरपूर वगैरे म्युनिसीपालिटीच्या गावी आणि जिल्ह्यातील रातंजन, कारी, देगाव वगैरे गावी महारांच्या मालकीच्या जागा गावठाणामध्ये सामील करण्यात आल्या आहेत, त्यामुळे महारांचे अतिशय नुकसान झाले आहे. तरी जिल्ह्याच्या कलेक्टरास या बाबतीत फेरचौकशी करण्याची ही सभा

विनंती करिते.

(५) या जिल्ह्यात ज्या गावी महारांना वतनी इनाम जमीनी नाहीत अशा गावच्या महार लोकांना त्यांच्या गावी जर पडित अगर फॉरेस्ट जमीनी असतील तर त्या जमीनी त्यांना वतन इनाम म्हणून देण्यात याव्या

(६) बेलापूर, मासणूर, राळेरास, पानगाव, चिखरडे, कोसगाव. चाकुरे 'शिखावी, Awe, दहिंगाव, भांबुर्डी, रातंजन, सुरडी, गुरसाळे ता. माळशिरस, लोणंद या गावात पाटील कुळकर्ण्याँच्या चिथावणीवरून रयत लोकांनी कट करून महारांना गावातून हाकून देण्याचा घाट घातला आहे. तरी सदरहू गावात होत असलेल्या जुलूमाची चौकशी सरकारने करून महारांचे संरक्षण करण्यास योग्य तो उपाय योजावा. अशी या संस्थेची आग्रहाची विनंती आहे.

(७). या जिल्ह्यात ज्या गावी महारांना वतनी इनाम जमीनी माहीत अशा गावच्या महार लोकांना त्यांच्या गावी जर पडित अगर फॉरेस्ट जमीनी असतील तर त्या जमीनी त्यांना वतन इनाम म्हणून देण्यात याव्या.

(८) या सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे असे मत आहे की जिल्ह्या-जिल्ह्यातील महार लोकांची आर्थिक गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी व त्यांचा संसार अधिक सुखमय व्हावा म्हणून प्रत्येक जिल्हा वतनदार महार संघाने सहकारी मंडळ्या स्थापन करण्याची, सूत कातणे व कापड विणणे या कामांचा प्रसार करण्याची व सहकारी शेतवर्ग वसाहती स्थापन करण्याची शक्य तितक्या लवकर व्यवस्था करावी.

(९) या सभेची सरकारला अशी विनंती आहे की, फॉरेस्ट जमीनी इतर वर्गाच्या लोकांना देण्यापूर्वी अस्पृश्यांच्या अर्जाचा विचार प्रथम करण्यात यावा व जर ज्या अटीवर फॉरेस्ट जमीन देण्याचे ठरले असेल त्या अटी अस्पृश्य वर्गातील माणसास कबूल असतील तर इतर जातीतील अर्जदारास न देता त्या अस्पृश्य वर्गातील अर्जदारासच देण्यात याव्या