११-१२-१९२७ हक्क बजावण्यासाठी सर्वानी सिद्ध झाले पाहिजे - Page 142

१६
हक्क बजावण्यासाठी सर्वानी सिद्ध झाले पाहिजे

बारा पाखाडी, पाली, दांडा रोड, वांद्रे येथील मंडळीच्या विद्यमाने रविवार ता. ११ डिसेंबर १९२७ रोजी संध्याकाळी ४ वाजता वांद्रे मुक्कामी डॉ. भीमराव आंबेडकर याच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाच्या मदतीकरिता जाहीर सभा भरली होती. सभेकरिता मंडळीनी शोभिवंत मंडप उभारला होता. वांद्रे व आसपासच्या खेड्यातील मिळून एक हजारावर लोकसमुदाय जमला होता. मुंबईहून डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर मेसर्स शिवत्तरकर, प्रधान, गुप्ते, जाधव, गंगावणे, गायकवाड, खोलवडीकर वगैरे मंडळी गेली होती. शिवाय बहिष्कृत हितकारिणी सभेने नवीन उभारलेले आंबेडकर पथक सभेच्या व्यवस्थेकरिता मुद्दाम सभाचालकांनी बोलाविले होते. मुंबईची मंडळी स्टेशनवर उतरल्यावर वांद्रेकरांनी त्यांच्याकरिता खास रिझर्व करून ठेविलेल्या मोटारीने मंडळी सभामंडपाकडे गेली. तेथे गेल्यावर लागलीच सभेच्या कामास सुरवात करण्यात आली व पुढे लिहिलेला ठराव सभेपुढे मांडण्यात आला. " आम्ही बारा पाखाडी, मुक्काम वांद्रे येथे राहणारी मंडळी ता. २५ डिसेंबरपासून डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाड येथे सुरू होणाऱ्या सत्याग्रहाला १७५ रु. देणगी देत आहो. तसेच येथे आलेल्या इतर मंडळीस विनंती करितो की त्यांनी शक्य तितकी जास्त मदत सत्याग्रहाकरिता करावी. या ठरावावर स्थानिक मंडळी पैकी मेसर्स जयगुरु देवगावकर, सखाराम भिकू , काशिराम हवालदार, गोविंद तुळसकर यांची भाषणे झाल्यावर तेथील स्थानिक पुढारी सोनू सजन संदीरकर यांनी भाषण करून १७५ रु. देणगी डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन केली. डॉ. साहेबांनी आभारपूर्वक देणगीचा स्वीकार करून पुढीलप्रमाणे भाषण केले. ते म्हणाले,

सद्गृहस्थहो।

आपण दिलेल्या देणगीब्दल मी आपला आभारी आहे. आज येश्वेन्जमलेल्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे सिंहावलोकन केले तर आपणाला मान खाली घालावी लागेल. कोकणात दापोली मुक्कामी पूर्वी सुभेदार, जमेदार, हवालदार वगैरेंचे टोलेजंग वाडे होते. पण त्या वाड्यावर आज मुसलमान लोकांनी नांगर फिरवला आहे. त्या वाड्यांचा तुम्हाला मागमूसही लागणार

rrr rr a a pe

बहिष्कृत भारत : २३ डिसेंबर १९२७.