२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 145

महाड सत्याग्रह परिषद १०३

जाणारांस झाली असती. हा जो आपला हक्के कायद्याने प्रस्थापित झाला आहे त्याची वहिवाट पाडण्याचे काम आता उरले आहे व ता. २५ डिसेंबर रोजी जी सभा बोलविण्यात आली आहे ती केवळ ही वहिवाट चालू करण्याचे हेतुनेच बोलावण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रकरणी सभेस हजर राहण्यास कोणासही वचक वाटण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे कोणाही सनातनधर्मी माणसाचा स्वार्थमूलक उपदेश ऐकण्याचे कारण नाही, हा प्रश्‍न सर्वांच्या माणुसकीचा आहे. इतर. स्पृश्य लोकांकडून आपण जन्मतः अपवित्र आहोत असा जो आपल्यावर कलंक लावण्यात आला आहे तो धुवून टाकावयाचा आहे

हा आपल्यावर कलंक आहे इतकेच नव्हे तर, ज्या सुशील आईबापांच्या पोटी

आपण जन्म घेतला त्या बिचाऱ्यांवर हा कलंक आहे. तो काढून टाकणे हे दरेक

सूपुत्राचे कर्तव्यकर्म आहे. ते कर्तव्य बजाविण्यासाठी वरील परिषदेस सर्वांनी हजर राहावे, अशी विनंती आहे.

या कामी द्रव्याची आवश्यकता आहे. तरी ज्या कोणास द्रव्याच्या रूपाने ' अथवा धान्याच्या रुपाने सहाय्य करणे असेल त्यांनी ते अवश्य करावे. या कामाकरिता आमच्या सहीशिक्क्याची पत्रे व पावती घेऊन स्वयंसेवक फिरतीवर जात आहेत. जी मदत देणे असेल ती त्यांच्याजवळ द्यावी व पावती घ्यावी किंवा सेक्रेटरी, बहिष्कृत हितकारिणी सभा, दामोदर हॉल, परळ, मुंबई, या पत्त्यावर परस्पर पाठवावी, अशी नम्र विनंती आहे.

आपले नम्र,

डॉ. भीमराव आंबेडकर,

एम्‌. ए., पीएच्‌. डी., डी. एससी. बार-अट-लॉ., एम्‌. एल्‌. सी.

| अध्यक्ष.

सभासद

रा. रा. शिवराम गोपाळ जाधव

संभाजी तुकाराम पौडकर

बाळाराम रामजी आंबेडकर*

निर्मळ लिंबाजी गंगावणे

राघो नारायण वनमाळी

गणपत महादेव जाधव

गोविंद रामजी आडरेकर

पांडूरंग महादेव ववूरकर

लक्ष्मण गणू पुसईनकर

*बाळाराम रामजी आंबेडकर यांचे निधन १२ नोव्हेंबर १९२७ रोजी झाले. डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांनी प्रस्तुत पत्रक या घटनेपूर्वी काढले असावे.-संपादक.