२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 146

१०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

रा. रा. सखाराम रत्नाजी नागावकर

अर्जुन रामजी नागावकर

चांगदेव रामायण मोहिते

पांडुरंग बाबाजी मांडलेकर

भागुराम रामजी शिरगावकर

सोनू सजन संदीरकर

विठ्ठल लक्ष्मण तिडकर '

भाऊ बाळू जाधव

भाविकनाथ रत्नू साळवे

पंढरीनाथ रामचंद्र आसुडकर.

रा. रा. सीताराम नामदेव शिवतरकर,

सेक्रटरी, सत्याग्रह कमिटी. "

“ सदरहू परिषद ता. २५/२६/२७ डिसेंबर १९२७ रोजी भरविण्यात आली होती. सभेची पूर्वतयारी करण्याकरिता रा. अनंत विनायक चित्रे यांची योजना करण्यात आली होती. महाड सत्याग्रहाच्या बाबतीत चित्रे हे आघाडीचे वीर होते. त्यांच्या शरीरप्रकृतीच्या मानाने हा लहानसा जीव एवढी मोठी कामगिरी पार पाडील की नाही, याबद्दल कोणासही शंका आली असती. परंतु ज्या सत्याग्रह कमिटीने या कामी रा. चित्रे यांची नेमणूक केली त्या कमिटीला रा. चित्रे यांच्यात केवढे मोठे चैतन्य भरले आहे, याची पूर्ण जाणीव होती व या परिषदेच्या कामी, रा. चित्रे यांनी जी कामगिरी करून दाखविली ती ज्यांनी ज्यांनी पाहिली त्यांना त्यांना याबाबतीत खात्री झाल्याशिवाय राहिली नाही. ही परिपद जर यशस्वी झाली असेल तर त्यातील सारे श्रेय रा. चित्रे यांनाच दिले पाहिजे. रा. चित्रे हे १५ दिवस अगोदर महाडास जाऊन पोहोचले. काही तरूण मंडळीखेरीज महाडातील सर्व स्पृश्य लोक सत्याग्रहास प्रतिकूल आहेत असे त्यांना दिसले व परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विध्ने उत्पन्न करून गावात परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यावयाचे नाही, असा गाववाल्याचा कट असल्याचेही त्यांना दिसून आले. तेव्हा आपल्या कायस्थ ज्ञातीतील काही तरूण मंडळीना हाती घरून आपला उद्योग तडीस नेण्याचे त्यांनी ठरविले व त्यांना शांताराम पोतनीस, केशवराव देशपांडे, रा. वामनराव पत्की, कमलाकर टिपणीस वगैरे मंडळीचे

"डॉ. भी. रा. आंबेडकार चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ३, पृष्ठ-१४१-४२.