२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 151

महाड सत्याग्रह परिषद १०९

महाड सत्याग्रह परिषद

कार्यक्रम

ता. २५ माहे डिसेबर सन १९२७

सकाळी १० वाजता अध्यक्षांचे भाषण, नंतर सर्व परिषदेने तळ्यावर जावयाचे व पाणी भरून आणावयाचे.

दुपारी साडेबारा वाजता जेवण, नंतर ३ वाजता मनुस्मृतीचा दहनविधी व प्रासंगिक भाषणे, त्यानंतर सर्व परिषदेने पुन्हा तळ्यावर जाऊन पाणी भरून आणावयाचे. रात्री ७-३० वाजता अल्पाहार, नंतर कीर्तन व सत्यशोधक तमाशा.

ता. २६ डिसेंबर सन १९२७

सकाळी १० वाजता जातीची अंतर्व्यवस्था सुधारण्यासंबंधी ठराव. नंतर सर्व परिषदेने तळ्यावर जाऊन पाणी भरून आणावयाचे. दुपारी साडे बारा वाजता जेवण, नंतर ३ वाजता सार्वजनिक ठराव व पुन्हा परिषदेने तळ्यावर जाऊन पाणी भरून आणावयाचे. रात्रौ साडे सात वाजता अल्पाहार, नंतर कीर्तन व सत्यशोधक तमाशा, त्यानंतर सर्व परिषद बरखास्त करण्यात येइल. फक्त २५० लोक मागे ठेवण्यात येतील व त्यांच्या हस्ते हा पाणी भरण्याचा उपक्रम तारीख २ जानेवारी सन १९२८ पर्यंत चालू ठेवण्यात येईल.

विशेष सूचना :-सदर प्रसंगी सर्व जमलेल्या मंडळीस अत्यंत विनयाने व शांततेने वागण्याची सत्याग्रह कमिटीची विनंती आहे व कोणताही प्रसंग आला असताना सत्याग्रहाकरिता जमलेली मंडळी शांततेचा भंग होऊ देणार नाहीत, याची खबरदारी घेतील, अशी आशा आहे.

i आपला FA,

सीताराम नामदेव शिवतरकर,

सेक्रेटरी, सत्याग्रह कमिटी.

आता मुंबईची मंडळी वेळेवर महाडास न पोहोचल्याकारणाने व इतर कारणांमुळे परिषदेच्या कार्यक्रमात फेरबदल करावा लागला तो प्रश्‍न निराळा. परंतु ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पार्हता मनुस्मृतीचा दहनविधी करणे, ही काही आयत्या वेळेची कल्पना नव्हे हे खास. बदललेल्या कार्यक्रमानुसार परिषदेच्या कामास सुमारे ४ वाजता सुरूवात झाली. प्रारंभी मुलांकडून ईशस्तवन झाल्यानंतर सत्याग्रह कपिटीचे सेक्रेटरी रा. शिवतरकर यांनी रा. श्रीधर बळवंत टिळक डॉ. पुरूषोत्तम सोळकी, एम. एल. सी. यांच्या सहानुभूतिपर तारा द इतरांची पत्रे वाचून दाखविली. नंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सत्याग्रह कमिटीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले भाषण वाचून दाखविले