२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 159

महाड सत्याग्रह परिषद ११७

व दुसरा प्लेबियन लोकानी निवडून द्यावा. ही देखील मागणी प्याट्रिशीयन लोकांनी कबूल केली व प्लेबियन लोकांना , साऱ्या क्लेशाचे निवारण झाले असे वाटून आनंद झाला. परंतु त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही.. रोमन जनतेचा असा प्रघात असे की कोणतीही गोष्ट तिच्या Seay नावाच्या ग्रामदेवतेस मान्य झाल्याशिवाय ती करावयाची नाही. त्याप्रमाणे द्रायब्यून जरी निवडला पण तो या देवतेला मान्य झाला नाही, तर त्याची निवडणूक रद्द समजून देवतेला पसंत पडेल असा दुसरा निवडावा लागत असे. देवतेला कोणती गोष्ट anager frat कोणती आवडत नाही हे ठरविण्याकरिता कौल लावण्याचे काम ज्या पुरोहिताचे असे तो रोमन लोकात ज्या अनेक लग्नाच्या पद्धती असत, त्यांपैकी कानफेराशियो पद्धतीने ज्यांचे लग्न झाले असेल अशा आई बापाच्या पोटी जन्मला असला पाहिजे असा शास्त्रार्थ असे. कानफेराशियो पद्धतीने लग्न करण्याची चाल फक्त प्याट्रिशीयन लोकांपुरतीच होती. म्हणून या डेल्फी देवाचा पुरोहित प्याद्रिशीयन

लौंकांनी- आपला कट्टाभिमानी असा एकादा पुरुष ट्रायब्यून निवडला तर देवता कौल देत नसे. ट्रायब्यूनच्या दर्जासोठी:प्लेबियन लोकांनी निवडलेला पुरुष जर प्याट्रिशीयन लोकांच्या ताटाखालचे मांजर असला तंरच ती देवता त्याला पसंत

करून त्याला अधिकारारूढ होण्याची संधी प्राप्त होत असे. दट्रायब्यून निवडण्याचा अधिकार मिळवून प्लेबियन लोकांनी काय साधले? काहीच नाही असेच उत्तर देणे भाग पडते. हा त्यांचा प्रयत्न निरर्थक ठरला याचे मुख्य कारण हेच की रोगाचे मरण कशात होते हे त्यांनी पूर्णपणे जाणून घेतले नाही. ते जर त्यांना कळले असते तर आपला ट्रायब्यून असावा अशी मागणी करतानाच पुरोहित कोण असावा हाही प्रश्‍न त्यांनी सोडवून घेतला असता. रोगाचे मरण नुसते ट्रायब्यून मागण्यात नव्हते, ते पुरोहितपण बळकावण्यात होते हे त्यांनी जाणले नाही. आपणही अस्पृश्यता निवारणाचा उपाय. शोधींत असताना या रोगाचे मरण कशात आहे, याची पूर्ण चौकशी केली पाहिजे. नाही तर आपलेही संधान चुकण्याचा संभव आहे.

नुसती भेटीबंदी किंवा लोटीबंदी गेली म्हणून अस्पृश्यता गेली असे मानण्याचा मूर्खपणा करू नका या बाबतीत एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती ही की लोटीबंदी व भेटीबंदी उठल्याने समूळ अस्पृश्यता जात नाही. . . या दोहीमुळे फार फार तर घराबाहेरची अस्पृश्यता जाईल. पण घरातल्या'अस्पृश्यतेला काही ढका लागत नाही. दारातल्या अस्पृश्यतेबरोबर घरातली अस्पृश्यता आपणास