MR/Khand_18_1 - Page 16

डॉ. आंबेडकरांचे सारेच विचार हे प्रेरणादायी आहेत. डॉ. आंबेडकरांच्या या विचारांचा गांभीर्याने अभ्यास केल्याशिवाय देशाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल

करता येणार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने ही भाषणे संकलित करून ती वाचकांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल समितीचे हार्दिक अभिनंदन. कालवश वसंत मून यांचे या क्षेत्रातील योगदान आज प्रकर्षाने आठवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणांचे संकलन करण्यासाठी त्यांनी फार मोठी मेहनत घेतली होती. अतिथी संपादक प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. एम. एल. कासारे, श्री. एन. जी. कांबळे यांनी उर्वरित भाषणे मिळविण्यासाठी व त्यांचे सुयोग्य संपादन करण्यासाठी घेतलेले परिश्रम मोलाचे आहेत. समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव आणि तरूण पिढीतले संशोधक श्री. हरी नरके यांनी या खंडाच्या प्रकाशनाला विशेष गती दिली. खात्याचे मंत्री आणि समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप वळसे-पाटील, यांनी समितीच्या दरमहा बैठका घेऊन मधल्या काळात प्रलंबित असलेल्या प्रकाशनाच्या कामांना अग्रक्रम दिल्यामुळे हा खंड इतक्या लवकर वाचकांना उपलब्ध होत आहे. समितीचे सर्व सदस्य आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे हा उत्तम ग्रंथ वाचकांना उपलब्ध झाला त्या सर्वांना धन्यवाद.

fa “9 Ge \ न्‌

(विलासराव देसपुखी

मुख्यमंत्री.

(बारा)