महाड सत्याग्रह परिषद ११९
बाणलेली तत्त्वप्रियता त्याला बाणू शकत नाही आणि म्हणूनच ब्राह्मणाशी समान अधिकारी होण्याऐवजी अस्पृश्यांपासून आपले विशिष्ट अधिकार कायम राखण्याची जास्त दक्षता हा वर्ग घेत असलेला दिसतो. या समाजक्रांतीच्या कामी तो समाज लुळा आहे. त्याच्या मदतीची आपण अपेक्षा करीत बसल्याने लावी पक्षीण आणि तिची पिले या धड्यात सांगितलेल्या पिकाच्या कापणीकरिता शेजास्यावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्याची जी गत झाली तीच गत आपली होईल. अस्पृश्यता निवारण करून समता प्रस्थापित करण्याचा हा जो कार्यभाग आपण शिरावर घेतला आहे, तो आपणच तडीस नेला पाहिजे. आपल्याशिवाय इतरांच्या हातून हा कार्यभाग होणार नाही. आपला जन्म या कार्यासाठीच आहे असे मानून ते करावयास लागणे, यातच आपल्या आयुष्याची सार्थकता आहे. हे पुण्य आपल्या पदरी पडत आहे ते ओटीत घेऊ या.
हे कार्य आत्मोद्धाराचे तर आहेच यास्तव हे कार्य आपल्या उन्नतीच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी शिरावर घेणे आपणा सर्वास प्राप्त आहे. अस्पृश्यतेमुळे . आपल्या अन्नात कशी माती कालविली गेली आहे, याची आपणास पूर्ण कल्पना करता येण्यासारखी आहे. आपल्याला अवगत आहे की, एकेकाळी आपल्या लोकांचा पलटणीत मोठया प्रमाणात भरणा होत असे. पलटणची नोकरी म्हणजे एक प्रकारची आपल्या लोकांची वतनदारी होती व त्या वतनदारीमुळे आपल्याला कोणाला पोटाची चिता करण्याचे विशेष कारण पडत नव्हते. आपल्या बरोबरीचे इतर वर्गाचे लोक पलटणीत, पोलिसात, कोर्टकचेरीत आपला शिरकाव करून घेऊन आनंदाने पोट भरीत आहेत. परंतु त्याच खात्यात आपल्यातील एकही माणूस औषधालासुद्धा आज मिळावयाचा नाही! याचे कारण आपणाला कायद्याने बंदी केली आहे असे नाही. कायद्याने सर्व गोष्टी मोकळ्या आहेत. परंतु इतर हिंदू लोक आपणास अस्पृश्य मानतात व हीन लेखतात [म्हणून ] [सरकार ] [हात ] टेकीत आले आहे व ते आपला सरकारी नोकरीत प्रवेश होऊ देत नाही. तसेच आपणाला उजळ माथ्याने कोणता धंदाही करता [येत ] [नाही. ] पेसे नसल्यामुळे आपल्याला धंदा करता येत नाही [हे ] [जरी ] [एकांशी ] [खरे ] [असले ] तरी, आपल्या अस्पृश्यतेमुळे आपल्या हातचा माल कोणी [घेणार ] [नाही ] [हीच ] पुष्कळ अंशी व्यापार करण्याच्या [मार्गातील ] [आपली ] [अडचण ] [आहे. ] एकूण अस्पृश्यता ही साधी सुधी गोष्ट नसून [ही ] [आपल्या ] [दारिद्र्याची ] [व ] [हीनतेची ] माय आहे व तिच्यामुळेच आपली ही विपन्न दशा आज [झाली ] [आहे. ] आपल्याला जर या हीन दशेतून वरती यावयाचे असेल तर आपण [हे ] कार्य हाती घेतलेच पाहिजे. त्याशिवाय आपली धडगत लागावयाची [नाही. ]