२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 165

महाड सत्याग्रह परिषद १२३

(३) अखिल प्रजा हेच सर्व प्रकारच्या अधिकारांचे व सत्तेचे उगमस्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे अगर वर्गाचे विशिष्ट हक्क जर ते बहुजन समाजाने दिलेले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर मग तो आधार राजकारणाचा असो अगर धर्मकारणाचा असो, मान्य होण्यास पात्र नाहीत. यास्तव समाजव्यवस्थेच्या बाबतीत श्रुती, स्मृती व पुराणे वगैरे ग्रंथांचे प्रामाण्य कबूल करण्यास ही सभा तयार नाही.

(४) कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हककांप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर जर मर्यादा घालण्यात आली तर ती दुसऱ्या व्यक्तीला तिचा तशाच प्रकारचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा, इतक्यापुरतीच घालता येईल. ती मर्यादा खुद्द लोकांनी केलेल्या कायद्यांनी ठरविली पाहिजे. धर्मशास्त्राच्या किवा दुसऱ्या कसल्याही आधाराने ती ठरविली जाता कामा नये. यास्तव, अष्टाधिकारासारख्या बाबतीत जातीजातीत ठरवून दिलेल्या असमानतेच्या व्यवस्थेचा ही सभा APR करते.

(५) जेवढ्या गोष्टी समाजास विघातक होतील तेवढ्याच करण्याची कायद्याने बंदी केली पाहिजे. जी गोष्ट कायद्याने मना केली नसेल ती करण्यास सर्वांना मुभा असली पाहिजे. तसेच, जी गोष्ट करणे कायद्याने अवश्य ठरविले नसेल ती गोष्ट करावयास कोणालाही भाग पाडता कामा नये. यास्तव, रस्त्यांचा, सार्वजनिक जागांचा, सार्वजनिक पाणवठ्यांचा व देवालयांचा वगैरे उपयोग करण्यास कोणाचा कोणाला मज्जाव असता कामा नये. यास्तव तसा मज्जाव करू पाहणारे लोक हे सुव्यवस्थित समाजरचनेचे आणि न्यायाचे शत्रू आहेत, असे ही सभा समजते.

(६) कायदा म्हणजे अमूक एका वर्गानेच ठरविलेली बंधने नव्हेत. तो कोणत्या: प्रकारचा असावा, हे ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस असला पाहिजे. हा कायदा संरक्षणात्मक असो वा शासनात्मक असो, तो सर्वांना सारखाच लागू असला पाहिजे आणि समाजरचना समतेच्या पायावर करावयाची असल्यामुळे मानसन्मान, अधिकार व व्यवसाय यांच्याबाबतीत जात आड येता कामा नये. भेदाभेद व्हावयाचा तो केवळ व्यक्तींच्या गुणभेदामुळेच झाला पाहिजे, जन्मामुळे होता कामा नये. याकरीता प्रचलित जातिभेदपद्धतीचा व तद्‌नुषंगिक विषमतेचा ही सभा तीव्र निषेध करते.

मांडणार-रा. सीताराम नामदेव शिवतरकर

अनुमोदन देणार-रा. भाऊ कृष्णराव गायकवाड

पुष्टी-रा. एन. टी. जाधव

दुजोरा-श्रीमती गंगाबाई सावंत.

ठराव २ रा.-शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक' गुलामगिरी कायम