२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 166

डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे १२४

वरील करणारी मनुस्मृतीतील पुढील वचने ध्यानात घेऊन व हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वांशी तुलना करून सदरहू ग्रंथ

या परिषदेचे ठाम मत ' धर्मग्रंथ ' या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे असे

झाले आहे व ते मत व्यक्‍त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा ती दहनविधी करीत आहे.

मांडणार-रा. गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे.

अनुमोदन-रा. राजभोज.

पुष्टी-रा. थोरात.

टीपः-वरील ठरावात म्हटलेली वचने पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात

येतील. सं. ब. भा.†

ठराव ३ रा.-सर्व हिंदुधर्मीय लोक हे एकवर्णीय समजण्यात यावेत. हिंदू या संज्ञेने हा वर्ग ओळखण्यात व संबोधण्यात यावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे वर्णविषयक संज्ञांनी अगर महार, मांग वगैरे जातिविषयक संज्ञांनी स्वतःला अगर दुसऱ्याला संबोधण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी असे या परिषदेचे मत आहे. वाटल्यास घंद्यावरून शिंपी, सोनार, माळी असे म्हणवून घेण्यास तसेच मराठा, कोकणस्थ, देशस्थ वगैरे प्रांत अगर देशनिदर्शक नावे उपयोगात आणण्यास हरकत नाही.

मांडणार--रा. कोंडीराम खोलवडीकर.

अनुमोदन--सुभेदार घाटगे.

पुष्टी--रा. निर्मळ गंगावणे.

दुजोरा--धोंडीराम नारायण गायकवाड़.

ठराव ४ था.- या परिषदेचे असे मत आहे की (१) धर्माधिकारी ही संस्था

लोकमतानुवर्ती व लोकनियुक्त करण्यात यावी. (२) हा पेशा स्वीकारण्याचा

व त्याच्याकरिता स्वतःला लायक करून घेण्याचा हक्क व योग प्रत्येक हिंदुमात्राला

देण्यात यावा. (३) धर्माधिकाऱ्यांची परीक्षा घेण्यात येऊन मग त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात यावीत. प्रशस्तीपत्रे न मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला धर्माधिकारी म्हणविण्याची अगर तत्संबंधी विधीकर्मे करण्याची कायदेशीर मनाई करण्यात यावी. (४) ग्रामधर्माधिकारी, तालुका धर्माधिकारी व प्रांत धर्माधिकारी अशी सामान्यतः धर्माधिकाऱ्यांची योजना wear यावी. (५) वरीलप्रमाणे

† संबंधित अंक उपलब्ध होऊ शकला नाही-संपादक.