महाड सत्याग्रह परिषद १२५
नियोजित केलेल्या धर्माधिकाऱ्यास धर्मविधी केल्याबद्दल दक्षिणा अगर इतर प्रकारचा मेहनंताना अगर पारितोषिक घेण्याचा अधिकार असू नये. त्याऐवजी इतर सर्व खात्यातील अधिकारी वर्गाप्रमाणे याही खात्यातील लहानमोठ्या अधिकाऱ्यांना सरकारी नोकर समजण्यात यावे व त्यांना सरकारातून योग्य तो पगार देण्यात यावा.
मांडणार--रा. पतितपावनदास बुवा.
अनुमोदन--रा. गिरजाशंकर शिवदास.
पुष्टी--रा. चवरे मास्तर.
| दुजोरा--रा. राघो नारायण वनमाळी.
वरील ठरावावर अत्यंत मार्मिक व मनोवेधक भाषणे झाली. ” *
“सत्याग्रह सभेतील मनुस्मृतीची दहनभूमी तयार करायला सहा कारागीर दोन दिवस खपत होते. सहा इंच खोल व सुमारे दीड फूट चौरस खड्डा खणून तो चंदनाच्या लाकडांनी भरून काढला होता. चार फूट उंचीचे चार खांब चार कोनावर उभे केले होते, ' मनुस्मृतीची दहनभूमी ' , ' अस्पृश्यता नष्ट करा ', ' भिक्षुकशाहीला गाडून टाका ' वगैरे पताका तीन बाजूंनी लावल्या होत्या. तारीख २५ डिसेंबर १९२७ रोजी रात्री ९ वाजता बापूसाहेब सहस्त्रबुद्धे व दुसरे पाच सहा अस्पृश्य साधू यांच्या हस्ते या दहनभूमीवर मनुस्मृतीचे पुस्तक ठेवून ते जाळण्यात आले.“ २
एवढ्याने पहिल्या दिवसाचे काम संपले.
“" दिवस दुसरा
पहिल्या दिवसाचे सभेचे काम रात्री साडेसात वाजता संपल्यानंतर मंडळी जेवणाची आतुरतेने वाट पहात होती. जिल्ह्यांतून आलेल्या लोकांनी सत्याग्रह कमिटीने कळंविल्याप्रमाणे आपापल्याबरोबर भाकऱ्या आणल्या होत्या. परंतु या लोकांनी सभेच्या पूर्वीच येऊन दोन दिवस तळ दिल्याकारणाने
` बहिष्कृत भारत : ३ फेब्रुवारी १९२८.
२ डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ३ रा, पू. १९४.