१२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्यांच्या भाकऱ्या संपून गेल्या होत्या. मुंबईहून आलेल्या मंडळीस तर सारा दिवस कडकडीत उपोषण घडले होते व कधी जेवण पदरात पडेल असे झाले होते. परंतु मुंबईहून जेवणाची भांडी महाडास पोहोचती झाली नसल्यामुळे सामग्री असूनही जेवण करता आले नाही. यामुळे सर्वांची निराशा झाली. असा प्रसंग येणार याची जाणीव सत्याग्रह कमिटीस होती व म्हणून तांदूळ, डाळ वगैरे पदार्थ तिने खरेदी केले त्याबरोबर चणेही खरेदी करून ठेवले होते. त्या रात्री जेवण्याच्याऐवजी सगळ्यांना AVATAR राहावे लागले. चण्यावर राहण्यात मंडळी विशेषशी खुश दिसली नाही. परंतु डॉ. आंबेडकरांनी आपल्या वाटणीचे चणे ओटीत घेऊन फक्के मारण्यास सुरवात केल्याचे पाहून जमलेल्या मंडळीने त्यांचे अनुकरण केले. २६-१२-१९२७ ला दुसरे दिवशी सकाळी ९ वाजता परिषदेच्या कामास सुरवात झाली. या दिवशी सत्याग्रहाची वाटाघाट करावयाची असल्यामुळे, परिषदेला विषयनियामक कमिटीचे स्वरूप देण्यात आले व त्याबरहुकूम डॉ. आंबेडकर यांनी सभेच्या भोवती उभे केलेल्या स्वयंसेवकास कोणाही परस्थ माणसास आत येऊ देऊ नये, अशी ताकीद दिली. नंतर डॉ. आंबेडकर यांनी सत्याग्रह करावा अशा अर्थाचा ठराव सभेपुढे मांडला.
ठराव मांडताना डॉ. आंबेडकर म्हणाले,
“मला काल कलेक्टर साहेबांनी मुलाखतीस बोलाविले होते. त्यात त्यांनी मला असे सांगितले की, आपण काही सत्याग्रहाचे विरूद्ध नाही. परंतु स्पृश्य लोकांनी या बाबतीत दिवाणी कोर्टात फिर्याद केली आहे व खटल्याचा निकाल होईपर्यंत, अस्पृश्य लोकांनी चवदार तळ्यावर जाऊ नये, अशा अर्थाचा तात्पुरता मनाई हुकूम त्यांनी मिळविला आहे. त्या कोर्टाचा अपमान न व्हावा म्हणून आपणाला या कामात पडावे लागत आहे. त्यास मी असे उत्तर दिले की, मी स्वतः सत्याग्रह करण्याच्या निश्चयाने आलो आहे. तो माझा निश्चय मी ढळू देणार नाही व सत्याग्रहास जमलेल्या लोकास सत्याग्रह करा असाच सल्ला मी देईन. परंतु सत्याग्रहास आलेल्या लोकांवर मी माझ्या मताचे दडपण पाडणार नाही. पण मनाई हुकूम मिळविला आहे म्हणून तुम्ही सत्याग्रह करू नका असे म्हणून मी त्यांना परावृत्त करणार नाही. त्यावर कलेक्टर साहेबांनी अशी इच्छा दर्शविली की, जर सत्याग्रह करण्याचे बहुमताने ठरले तर जमलेल्या लोकास दोन सदुपदेशाचे शब्द सांगण्याची मला सवलत द्यावी. ती सवलत देईल असे वचन