१२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खालील गृहस्थांनी प्रतिकूल भाषणे कली,
(१) शिवराम सखाराम हाटे. (२) कृष्णा येसू. (३) गाडगेबुवा साहेब. (४) गोविंद हवालकर. (५) राघू आनंदा शिवतरकर. (६) राघो नारायण वनमाळी. (७) पुंजाजी नवसाजी जाधव. (८) एन. टी. जाधव.
ध्यानात घेण्यासारखी गोष्ट ही की, सत्याग्रह करण्याकरिता रा. रा. विठोबा महादेव वाडवल, राहणार कोलवली हे एकच एक वयोवृद्ध मराठे गृहस्थ आले होते. अनुकूल-प्रतिकूल भाषणे झाल्यावर ते उठून उभे राहिले व म्हणाले, “ मी मराठा आहे. माझ्या गावचे महारबंधू- रुसले आहेत. ते गावात येत नाहीत. गावाची वेस रंडकी झाली. तिचा आम्हास काय उपयोग ? आमच्या महार बंधूंचा पाण्याचा हट्ट आहे. तर तो आम्ही पुरविला पाहिजे. म्हणून मी सत्याग्रह करण्यास आलो आहे."
वरील वक््त्यांच्या भाषणांचा परिणाम काय होणार, याबद्दल कोणासच शंका नव्हती. ज्यांना तशी शंका होती त्यांची शंकानिरसन होण्यास मुळीच वेळ लागला नाही. कारण सत्याग्रहास अनुकूल असलेल्या TRAN जसे लोक बोलू देत तसे सत्याग्रहास प्रतिकूल असलेल्या वक्त्यास बोलू देईनात. इतके की, शेवटी डॉ. आंबेडकरांना “ तुम्ही प्रतिकूल वक्त्यांचेही ऐकून घ्या '' अशी विनवणी करावी लागली. अनुकूल-प्रतिकूल वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर डॉ. आंबेडकर
म्हणाले,
“ एकंदरीत सभेचे मत सत्याग्रहास अनुकूल आहे असेच म्हणणे भाग आहे. त्याबद्दल मला आनंद वाटतो. पण माझ्यापाठी आंधळ्यांचे सैन्य नको. मी सांगतो म्हणून किंवा इतर लोक सांगतात म्हणून तुरुंगात जाऊन फशी पडणारे लोक मला नकोत. तुरुंगात जाईन पण माझी अस्पृश्यता मी घालवीन असे म्हणणारा माणूस मला पाहिजे. सत्याग्रह करावयाचा किंवा नाही हे निश्चित करण्यापूर्वी अशाप्रकारचा आत्मयज्ञ करण्यास किती माणसे तयार आहेत हे ` ठरविणे प्राप्त आहे. टाळ्यांच्या गजराने किंवा हात वर केल्याने ठरविण्यासारखी ही सोपी बाब नाही. ती मोजदाद करूनच ठरविली पाहिजे. म्हणून जी माणसे तुरुंगात जावयास तयार असतील अशा लोकांची मोजदाद करावयास मी लावणार आहे. त्या मोजदादीवरून जर बहुमत सत्याग्रहास अनुकूल आहे असे दिसले तर कलेक्टर साहेबांना मी कळवीन व संध्याकाळी त्यांना सभेत येऊन तुम्हापुढे भाषण करण्यास निमंत्रण देईन. त्यांचे म्हणणे ऐकूनही जर तुमचे मत कायम