२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 171

महाड सत्याग्रह परिषद | १२९

राहिले तर सत्याग्रह करू. आता १२-३० झाले, तेव्हा ही बैठक संपली आहे अंसे ते जाहीर करतात तोच मुंबईच्या ब्राह्मणेतर पक्षातर्फे श्री. केशवराव जेधे व श्री. दिनकरराव जवळकर हे मुंबईहून स्पेशल मोटारीतून आले व सभामंडपात दाखल झाले. अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास विनंती केल्यावरून श्री. जवळकर म्हणाले, धर्माचा लढा लढण्याकरिता आपण आला आहात हे ठीक आहे. दुर्दैवाने काही मराठे लोक तुम्हास विरोध करीत आहेत याबद्दल मी मराठा असल्यामुळे मला फार लज्जा वाटत आहे. आम्ही मराठे व ब्राह्मणांनी तुम्हास जो आजपर्यंत त्रास दिला त्याबद्दल आम्ही फार पातकी आहोत. आम्ही तुमचे हातात जो खराटा दिला आहे तो तुम्ही टाकून दिला पाहिजे. जेथे आमची मालकी आहे तेथे तुमचीही आहे. तुमचे पुढारी बॅरिस्टर आंबेडकर यांनी चालविलेली चळवळ तुमच्या वाजवी हक्कांच्या प्रस्थापनेसाठी आहे. मी दोन वेळा तुरुंगात गेलो. तुरुंगास भिण्याचे मुळीच कारण नाहीं. इंग्रज सरकारचे तुरुंगात जातीभेद नाही. बाहेरच्या ह्या भेदजन्य नरकात जगण्यापेक्षा तुरुंगवास अधिक बरा. मी व श्री. जेधे तुम्हास सत्यशोधक समाजाची सहानुभूती दाखविण्यास

आलो आहो. मराठे लोक महारांकडून जास्त काम करून घेतात. त्यांचा घाम

पाहून कुळकर्ण्यास पाझर फुटत नाही. मराठ्यांना परमेश्वराने पुढचा जन्म अस्पुश्याचा द्यावा डॉ. आंबेडकरांसारखा ज्ञानी व कर्तबगार अस्पृश्यांमध्ये नाही. ते तुमच्याकरिता प्रयत्न करीत आहेत. त्यांचे मागोमाग तुम्ही गेले पाहिजे. हिंदुस्थानचा देव भटाळलेला आहे, तो देव तुमचे दुःख नाहीसे करणार नाही. तो बॅरिस्टर आंबेडकरांसारखाच मनुष्य नाहीसे करील. आंज जंर मी महार असतो तर आनंदाने तुमचेबरोबर तुरुंगात आलो असतो, तुम्ही कायदा भंग करून आपल्या हक्कांचे प्रस्थापन केले पाहिजे. हा दिवस हिंदुंच्या इतिहासात फारच महत्त्वाचा गणला जाणार आहे. तुरुंगाची भीती तुम्हास वाटण्याचे कारण नाही. ती भीती तूपपोळी खाणाऱ्या ब्राह्मणांना वाटेल. स्पृश्यांना वठणीवर आणणे तुमच्या हाती आहे. तुम्ही हिंदपुत्र आहात. ,हर हर महादेव असा जयजयकार करून तळे काबीज करा व तुमचे सेनापती डॉ. आंबेडंकर साहेब सांगतील तसे वागा. हे माझे स्वतःचे मत आहे. ब्राह्मणेतर. पक्षाचे मत यापेक्षा निराळे आहे व ते सांगण्यासाठी मी आलो आहे, फिर्यादीचा निकाल होईपर्यंत सत्याग्रह तहकूब ठेवावा असा ब्राह्मणेतर पक्षाचा आपणास संदेश आहे. सरकारशी विरोध करणे हे या पक्षाच्या मते अस्पृश्य वर्गास हितावह नाही. त्यानंतर श्री. केशवराव जेधे म्हणाले, ज्या. लोकांनी आपणास छळले. त्यांचे आपण परिच्छेदन केलेच पाहिजे. हा झगडा माणुसकी स्थापन करण्याचा

आहे. गाढवे व कुत्री ज्या तळ्यावर पाणी पितात त्या तळ्यावर तुम्हास मज्जाव