१३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
असावा हे लांछनास्पद आहे. तुम्ही भाला, संग्राम व मनुस्मृती जाळली हे फार योग्य केले. सत्याग्रह करून तुरुंगात जाणेच इष्ट आहे. जे लोक तुम्हाला विरोध करतील त्यांचे ऐकू नका. येणेप्रमाणे भाषण झाल्यावर सभा दुपारी दीड वाजता तहकूब ठेवण्यात आली.
कलेक्टर साहेबांची मध्यस्ती
सत्याग्रही लोकांची मोजदाद करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी पूर्वी सुचविल्याप्रमाणे दहा बारा लोकांना तुरुंगात जाण्यास कोण तयार आहेत त्यांची नाव गाव निशी यादी तयार करण्याचे कामावर योजिले. अवघ्या तासात ३८८४ लोकांनी नावे नोंदविली. आम्ही तुरुंगात जाणार असे घरच्या मंडळीस सांगून आलो तर आता आम्ही परत कसे जावे ? अशी भाषा आलेले सारेच लोक वापरू लागले. शेवटी नावे लिहून घेण्यास बसविलेले लोक कंटाळले व म्हणाले, सारेच लोक तयार असलेले दिसतात, मग नावे लिहून घेण्यात काय हशील. त्यामुळे साडे तीन वाजता नावे लिहून घेण्याचे काम बंद केले व डॉ. आंबेडकर यांनी कलेक्टर साहेब यास पत्राने कळविले की, '' मंडळीचा सत्याग्रह करण्याचा निश्वय ठरला आहे. आपल्याला सभेत येऊन आपली बाजू मांडावयाची आहे असे आपण म्हणाला होता तेव्हा सभेस संध्याकाळी ५ वाजता सुरूवात होणार आहे, तरी आपली इच्छा असल्यास आपण यावे." त्याप्रमाणे कलेक्टर साहेब व पोलीस सुपरिटेन्डेण्ट मि. wee, पोलीस इन्स्पेक्टर, फौजदार वगैरे मंडळी आली डॉ. आंबेडकर म्हणाले
““ संध्याकाळी मी सांगितलेच होते की, कलेक्टर साहेबांची आपणास दोन शब्द सांगण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे ते सभेत हजर झाले आहेत, तेव्हा त्यांनी आपले कायं मत असेल ते मांडावे अशी मी त्यांना विनंती करितो.” यानंतर कलेक्टर साहेब यांनी खालीलप्रमाणे मराठीत भाषण केले :
मी कशाकरिता आलो अहे हे तुम्हास अध्यक्ष साहेब यांनी सांगितले. मला मराठी येत नाही, सबब माफी मागतो. तुम्ही ३/४ महिन्यांपासून सत्याग्रहाची तयारी करिता हे आम्ही ऐकतो, व तुम्हास सत्याग्रह करता येणार नाही हे सांगून वाईट वाटेल. त्याबद्दल तुम्हास उपदेश करण्याची माझी इच्छा आहे. मुंबई ले. कोन्सिलचा ठराव-शाळा व सार्वजनिक तलाव, विहीरीस शि देणे जरूर आहे-असा आहे. त्याप्रमाणे मुंबई सरकारने हुकूम दिला व म्युनिसीपालिटी, लोकलबोर्ड यासही कळविले आहे की, अस्पृश्य लोकास हरकत करू