२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 173

महाड सत्याग्रह परिषद १३१

नये. त्याप्रमाणे तुमची इच्छा सरकारचे हुकूमाप्रमाणे चवदार तळ्यावर जाण्याची आहे. हरकत नसती तर आम्ही तळ्यावर जाण्यास परवानगी दिली असती. परंतु १०/१२ स्पृश्य लोकांनी दिवाणी कोर्टात दावा केला की, हे तळे खाजगी आहे. तलाव खाजगी आहे किंवा सार्वजनिक आहे हे मला सांगता येत नाही, परंतु कागदपत्र साक्ष पाहून, वकिलाचे ऐकून निकाल देऊ. खाजगी असल्यास स्पृश्य लोकांनी बंदी करणे योग्य आहे. परंतु खाजगी नसेल तर काही हरकत नाही. परंतु कोर्टाने तलाव सार्वजनिक याबद्दल निकाल दिला म्हणजे खुले होईल. दुसरा प्रश्‍न असा की, कोर्टाकडून हंगामी हुकूम मिळविला कीं कोर्टाकडून निकाल होईपर्यंत जावयाचे नाही. आज तुम्हाला माझा उपदेश असा होत आहे की, आपण कोर्टाचा हुकूम मान्य केला पाहिजे. कोर्टाचा हुकूम अमान्य केला तर तुम्हास फायदा मिळेल असे वाटत नाही. मला माहीत आहे की, आता. २/४ महिन्यापासून तयारी केली व तुमची उमेद आहे की, तलावात जाऊ. पण शहाणा माणूस नेहमी कायद्याप्रमाणे वागत असतो. तुम्हास माहीत आहे की तुमचे विरुद्ध लोकांनी कायदा मोडल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली. त्याचप्रमाणे तुम्ही कायद्याप्रमाणे चालला नाही तर तुम्हास त्रास व शिक्षा होईल, फायदा होणार नाही. तुमचा हेतू कीं, तलावात जावे पण आमची हरकत होईल. आता तुम्हास माहीत आहे की, मी जिल्ह्याचा कलेक्टर आहे. तुम्हाकरिता बोलत आहे की, येथे दोन पक्ष आहेत. स्पृश्य लोक, दुसरे बाजूस अस्पृश्य. सरकार कोणते बाजूस आहे तर अस्पृश्य लोकांचे बाजूस आहे. जर तुम्ही उपदेश ऐकत नाही व सरकारचा अपमान केला तर निराळा परिणाम होईल. हे वरील सर्व लक्षात ठेवा की, मी तुमचा दोस्त आहे व सरकार तुमचे माबाप आहेत. तर

आज फार दिलगिरीने ऐकतो कीं, सर्व तयारी करून सत्याग्रह केलाच पाहिजे

व सरकारचा अपमान करून तलावास गेले पाहिजे, तर हे असे सांगणारे दोस्त नाहीत, खोटे दोस्त आहेत व हे सर्व काम शांततेने व कायद्याने केले पाहिजे. ह्यासाठी धीराने वागा. कायद्याप्रमाणे कोर्टात दावा चालू आहे. लुमच्यातफे निकाल होईल तर तलाव खुला होईल.. विरूद्ध झाला तर कोर्टात अपील करा. तोपर्यंत दुसरे सार्वजनिक तलावाबद्दल सत्याग्रह करा. तर आता कायद्याविरूद्ध व सरकारचे विरूद्ध वागू नका. तशाने फायदा मिळणार नाही याबद्दल एक गोष्ट सांगतो. समजा दोन भाऊ आहेत एक हरी व दुसरा भाऊ. तर हरी म्हणाला आता उन्हाळा संपल्यावर भात पेरू. तर भाऊ म्हणाला सर्व तयारी झाल्यावर भात पेरू. तर हरीने घाई करून भात पेरला व भाऊने जमीन सर्व तयार झाल्यावर भात पेरला. तर कोणास चांगले :