१३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पीक मिळाले असेल याचा विचार करा. ह्याप्रमाणे तुंम्ही कराल त्याप्रमाणे जय मिळेल. आता घाईघाईने सरकारचे हुकूमाविरूद्ध वागला तर वरील उदाहरणाप्रमाणे होईल. मग तुम्ही विचाराल की, आता आम्ही सत्याग्रहासाठी जमलो, तर तुम्ही त्याचेऐवजी असा ठराव करा कीं, आम्ही आता सुरू करून जोपर्यंत जय मिळेल व जोपर्यंत अस्पृश्य लोकांना सार्वजनिक तळे खुले होईल | तोपर्यंत आम्ही काम करणार. राहाणार नाही. मग तुमचे अध्यक्षसाहेब बॅरिस्टर आहेत त्यांना कोर्टाचे काम माहीत आहे. त्यांचेबरोबर तुम्ही उपदेश घेऊन पुराव्याकरिता साक्षी तयार करा. शिवाय ह्या कामासाठी काही पैशाची जरुरी आहे. तरी ह्याकरिता तयारी करा. हे माझे काम नव्हे. एक गोष्ट सांगतो व बसतो. १२ वर्षापासून ह्या तालुक्याचे महार लोक ओळखतो. मला माहीत आहे की, हे चांगले आहेत व सरकारची नोकरी करितात व असे पुष्कळ लोक आहेत की, पलटणीत काम केलेले सुभेदार, हवालदार, जमादार, शिपाई आहेत. ह्यांनी लष्करमध्ये नोकरी केली. सरकारचे अपमान करतील असे मला वाटत नाही. माझा उपदेश असा की, जोपर्यंत दाव्याचा निकाल होईल तोपर्यंत तलावाचे कार्य सोडा. तसे नाही केले तर काय फायदा मिळेल ? तुमचे
- हेतूला नुकसान होईल. तुम्हाला माहीत आहे की, आम्ही सर्व पोलिसांचा ` बंदोबस्त केला आहे की, तलावास जाणेस वाट नाही व जर तसे जाणेकरिता प्रयत्न कराल व तुमचे विरूद्ध स्पृश्य लोक होतील व सरकारही होईल, तर यात काही फायदा नाही. जरा थांबले पाहिजे. तर तुमच्यामध्ये पुढारी शहाणे माणसे की, ज्यास कोर्टाचे काम माहीत आहे, त्याच्याकडे काम करा. तुमच्यातफें होईल. मग काही हरकत नाही. तुमचेतफॅ उपदेश दिला. तुम्हास जे बोलत आहे ते तुमचे दोस्त असे समजून कराल अशी उमेद आहे."
नंतर अध्यक्षांच्या परवानगीने श्री. जवळकर म्हणाले, ”' सकाळी आल्यापासून आम्ही महाडातील सर्व मराठा पुढाऱ्यांच्या गाठी घेतल्या. त्यापैकी प्रत्येकाने सांगितले की, आम्ही अस्पृश्यांविरुद्ध जाणार नाही. याचा पुरावा म्हणून त्यांनी मला एक जाहीरनामा लिहून दिला आहे. तो खालीलप्रमाणे आहे :
श्री. केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यास,
महाड ता. २६-१२-१९२७. आमचे पुढील म्हणणे-महाड मराठे समाजाचे मत-अस्पृश्य समाजापुढे मांडणे.
महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याकरिता येथे मोठ्या प्रमाणावर