२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 175

महाड सत्याग्रह परिषद . १३३

अस्पृश्य समाज स्वोज्नतीचा प्रयत्न करीत असता, त्यांच्याविरुद्ध मराठे आहेत अशा कंड्या काही परजातीचे बेजबाबदार लोक उठवीत आहेत, त्या सर्वस्वी निराधार आहेत. आम्ही महाडचे मराठे, मराठा समाजाचे पुढारी म्हणून कळवीत आहोत की, अस्पृश्यांनी आपले मनुष्यपणाचे हक्क मिळवावेत. त्यांच्या आड येण्यास मराठा समाज तयार नाही. उलट अस्पृश्यांच्या प्रयत्नाबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती वाटत आहे. मात्र हे प्रयत्न करीत असता अस्पृश्य समाजाने सनदशीर मार्गाने प्रयत्न केल्यास अस्पृश्य समाजाचे कल्याण त्वरित होईल असे आमचे मत आहे. i |

` सत्याग्रहाच्या बाबतीत आम्ही तटस्थ राहणार असा ठराव ता. २१-१२-२७ रोजी पासही केला आहे.

हल्ली जो अस्पृश्यांविरुद्ध तळ्यासंबंधी कोर्टात दावा लागला आहे, त्यात जे ९ स्पृश्य आहेत त्यापैकी जो एकच मराठा गृहस्थ आहे त्याने या बाबतीत मराठा समाजाचे मत घेतलेले नाही व त्यांना मराठा समाजाची या बाबतीत मुळीच संमती नाही. | |

सह्या

नारायण AAT ARTS, पेन्टर

PSR पांडुरंग शिंदे

किसन बाबा धुमाल

तुकाराम सावळाराम पानसरे

कृष्णाजी ग्यानूबा पवार

बाबाजीराव माधवराव दळवी

सीताराम गोपाळ चौधरी

यावरुन तुम्हास दिसेल की, मराठा वर्ग तुम्हाविरुद्ध नाही. तथापि, ब्राह्मणेतर पक्षाचे असे सांगणे आहे की, फिर्यादीचा निकाल होईपर्यंत सत्याग्रह थांबविणे इष्ट आहे. कलेक्टर साहेबांचेही तेच मत आहे. या उभयपक्षांचे म्हणणे तुम्ही ऐकावे, हे बरे असे मला वाटते. “ नंतर सुभेदार घाटगे म्हणाले, " मला देखील तसेच वाटते. मी स्वतः पेन्शनर सुभेदार आहे. सत्याग्रहात भाग घेतला तर माझ्या पेन्शनला धक्का पोहोचेल, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरी पण सत्याग्रह करण्याच्या निश्चयाने येथे पुण्याहून आलो. परंतु मला एक गोष्ट सांगणे प्राप्त आहे. ती ही की, मी स्पृश्य लोकांविरूद्व सत्याग्रह करण्यास आलो होतो. परंतु हे लोक सरकारच्या आड लपून आपली व सरकारची झुंज लावून